तिसवाडी: मेरशी येथे शासकीय निवारा गृहाचा प्रस्ताव

'अपना गृह' च्या धर्तीवर निवारा गृह तयार करण्याची सरकारची योजना

Story: प्रतिनिधी। गोेवन वार्ता |
02nd October, 12:48 am
तिसवाडी: मेरशी येथे शासकीय निवारा गृहाचा प्रस्ताव

पणजी : सरकारने महिलांसाठी शासकीय निवारागृहे बांधण्याचा प्रस्ताव आहे. मेरशी येथील 'अपना गृह' च्या धर्तीवर हे तयार करण्याची योजना सरकार आखत आहे. या बाबतचा पुढील निर्णय सार्वजनिक बांधकाम विभाग घेईल, असे महिला व बालविकास विभागाने सांगितले.

महिला व बाल संचालनालयाकडे संकटग्रस्त आणि बेघर महिलांना निवारा देण्यासाठी निवारा गृहा नाहीत. त्यांना स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या निवारा गृहांवर अवलंबून राहावे लागते. यासाठी संचालनालय त्यांना अनुदान देते.

स्वयंसेवी संस्थांच्या निवारागृहात असलेल्या प्रत्येक महिलेसाठी निवास, भोजन, औषध, आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सबसिडी दिली जाते. अनुदानाची रक्कम घरात राहणाऱ्या महिलांच्या संख्येवर अवलंबून असते.

नवीन निवारा बांधण्यासाठी आम्ही सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव मान्य झाला असून जागा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आम्ही खाटांच्या संख्येइतकी निवारा गृहाची जागा शोधत आहेत, असे संचालनालयाने सांगितले.

जागा शोधण्याची जबाबदारी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेर्णा येथे या प्रकल्पांसाठी जागा शोधली होती पण ती पुरेशी नव्हती.

आता आम्ही नवीन जागा मेरशी 'अपना घर' परिसरात पाहिली आहे. मात्र, याबाबतचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार असून त्यावर विचार विनीमय सुरू असल्याचे संचालनालयाने सांगितले.

हेही वाचा