सदर दुचाकी कर्नाटक येथील आनंद कट्टीमणी याच्याकडे आढळून आली
मडगाव : कोलवा येथील तावेर्न हॉटेलनजिक पार्क दुचाकी चोरणार्या संशयित आनंद कट्टीमणी (रा. माजोर्डा, मूळ कर्नाटक) याला कोलवा पोलिसांकडून अटक करण्यात आली. संशयिताकडून चोरीची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
कोलवा येथील कोलवा तावेर्न हॉटेलसमोर खुल्या जागेत पार्क केलेली अॅक्टीव्हा स्कूटर अज्ञात चोरट्याने ६ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून ७ सप्टेंबर सकाळी साडेनऊ वाजेपर्यंतच्या काळात चोरी केली. याप्रकरणी उलोगिओ गोम्स (रा. गांधावली, कोलवा) यांनी कोलवा पोलिसांत तक्रार करत ५८ हजाराचे नुकसान झाल्याचे नमूद केले होते.
कोलवा पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात सदर दुचाकी माजोर्डा रेल्वे स्थानकानजीक राहणार्या मूळ बागलकोट कर्नाटक येथील आनंद कट्टीमणी याच्याकडे आढळून आली. कोलवा पोलिसांनी संशयित कट्टीमणी याला दुचाकी चोरीप्रकरणी अटक केली असून चोरीची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.