आजपासून ओटीटीवर कोरियन ड्रामा ‘पाचिंको’सह नवीन मालिका

उर्फी जावेदचे जीवन उलगडणार ‘फॉलो कर लो यार’मधून

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
23rd August, 12:14 am
आजपासून ओटीटीवर कोरियन ड्रामा ‘पाचिंको’सह नवीन मालिका


कोरियन ड्रामा ‘पाचिंको’च्या नवीन सीझनपासून नेटफ्लिक्सवरील ‘द फ्रॉग’ नावाची नवीन मिस्ट्री थ्रिलर मालिका या शुक्रवारी ओटीटीवर झळकणार आहेत. तसेच इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेदचा रिॲलिटी शो, ‘फॉलो कर लो यार’ही अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. तसेच ‘स्री २’शी टक्कर देण्याची हिम्मत कोणत्याही निर्मात्याने न दाखविल्याने थिएटर रिलीजमध्ये कोणतेही बडे सिनेमे नाही आहेत.


फॉलो कर लो यार (ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ)
‘फॉलो कर लो यार’ हा एक रिॲलिटी शो आहे जो इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेदच्या जीवनावर आधारीत आहे. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवरील या आगामी रिॲलिटी शोमध्ये तिचा आतापर्यंतचा प्रवास उलगडण्यात आला आहे.


रायन (ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ)
बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केल्यानंतर, तमिळ ॲक्शन थ्रिलर रायन शुक्रवारी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर झळकणार आहे. हा चित्रपट एका साध्या माणसाच्या जीवनाचा उलगडा करतो, जो आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मोहिमेवर निघतो. त्याचा शोध त्याला अंडरवर्ल्डच्या अंधारात घेऊन जातो. पुढे जे उलगडते तेच चित्रपटाचा मुख्य भाग बनते. या चित्रपटात धनुष मुख्य भूमिकेत आहे.


द क्रो - थिएटर्स
बिल स्कार्सगार्ड आणि एफकेए ट्विग्स यांच्या प्रमुख भूमिका असलेला, हा चित्रपट १९९४ च्या द क्रो या क्लासिक चित्रपटाचा आधुनिक रिमेक आहे. चित्रपटाचे कथानक एरिक ड्रावेन नावाच्या संगीतकाराभोवती फिरते, ज्याच्या भावी पत्नीची हत्या केली जाते. त्यानंतर तो त्याचा बदला घेण्यासाठी बाहेर पडतो.


ड्राईव्ह अवे डॉल्स (जियोसिनेमा)
एथन कोएन दिग्दर्शित हा विनोदी चित्रपट जेमी आणि मारियन नावाच्या दोन महिलांभोवती फिरतो, ज्या तल्लाहसीला अचानक रोड ट्रिपसाठी निघतात, तथापि, जेव्हा त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये अडकतात.


इनकमिंग (नेटफ्लिक्स)
या शुक्रवारी येणाऱ्या नवीन ओटीटी प्रकाशनांच्या यादीतील हा चित्रपट हायस्कूलमधील चार नवोदितांच्या भोवती केंद्रीत आहे. जे त्यांच्या पहिल्या शालेय पार्टीसाठी स्वतःला तयार करताना किशोरावस्थेतील विविध आव्हानांना सामोरे जातात. जेव्हा ते अनपेक्षित परिस्थितीत अडकतात तेव्हा परिस्थिती नाट्यमय वळण घेते.


पाचिंको सीझन २ (अॅपल टीव्ही +)
लोकप्रिय कोरियन मालिका पाचिंको सीझन २ अॅपल टीव्ही + वर झळकणार आहे. या मालिकेचा नवीन भाग एका कोरियन स्थलांतरित कुटुंबाच्या चार पिढ्यांभोवती फिरताे. १९१५ ते १९८९ या कालावधीत या कुटुंबाला आपली मातृभूमी सोडल्यानंतर अनेक संकटांचा सामना करावा लागतो. हा कोरियन ड्रामा हे त्याच नावाच्या मिन जिन ली यांच्या २०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीवर आधारित आहे.


ब्लिंक ट्वाईस (थिएटर्स)
सायकोलॉजिकल थ्रिलर्सप्रेमींसाठी थिएटरमध्ये ब्लिंक ट्वाईस, हा चित्रपट दाखल होणार आहे. हा चित्रपट स्लेटर किंग नावाच्या एका टेक अब्जाधीशाच्या अवतीभवती फिरतो. जो कॉकटेल वेट्रेस, फ्रिडाला त्याच्या खासगी बेटावर सुट्टीसाठी आमंत्रित करतो. ती आमंत्रण मान्य करते; त्यानंतर त्या बेटावर विचित्र गोष्टी घडतात. तेव्हा त्यांची सुट्टी एक भयानक स्वप्न बनते. या चित्रपटात चॅनिंग टॅटम, नाओमी ॲकी, ख्रिश्चन स्लेटर आणि सायमन रेक्स यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


फ्रॉग (नेटफ्लिक्स)
या शुक्रवारी दाखल होणाऱ्या ओटीटी प्रकाशनांच्या यादीमध्ये एज-ऑफ-द-सीट मिस्ट्री थ्रिलर, द फ्रॉगचा समावेश आहे. आगामी हा कोरियन ड्रामा एका रहस्यमय स्त्रीभोवती फिरतो. यात किम यून सेओक, यून के संग, को मिन सी आणि ली जंग युन प्रमुख भूमिकेत आहेत.


एलियन: रोम्युलस (थिएटर्स)
एलियन मूव्ही फ्रँचायझीमधील सातवा चित्रपट, एलियन: रोम्युलस तरुण अंतराळ वसाहती करणाऱ्यांच्या एका गटाला फॉलो करतो. ज्यांना जुन्या आणि दुर्लक्षित अंतराळ स्थानकांमध्ये अत्यंत भयानक जीवन स्वरूपाचा सामना करावा लागतो. आगामी साय-फाय थ्रिलरच्या कलाकारांमध्येकैली स्पेनी, डेव्हिड जॉन्सन, आर्ची रेनॉक्स, इसाबेला मर्सिड, स्पाइक फिअर आणि आयलीन वू यांचा समावेश आहे.

हेही वाचा