निकृष्ट रस्त्यांबद्दल कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार

पणजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांचे आश्वासन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th August, 12:23 am
निकृष्ट रस्त्यांबद्दल कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार

पणजी : शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेवरून पणजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वातावरण तापले होते. रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याविषयी सार्वजनिक बांधकाम खात्याला कळवून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यास सांगितले जाणार, असे आश्वासन पणजीचे महापौर रोहीत मोन्सेरात यांनी दिले.

भाटले ते फोन्तेनास तसेच इतर भागातील हॉटमिक्स रस्ते पहिल्याच पावसात वाहून गेल्याने रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या विषयावरुन विरोधी नगरसेवकांनी गोंधळ घातला. २१ मे रोजी भाटले येथील येथील रस्ता हॉटमिक्स केला आणि १० जुलै रोजी तो वाहून नेला. सार्वजनिक बांधकाम विभाग या कामावर देखरेख करत आहे तर ठेकेदाराने निविदेनुसार काम करणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे, असे नगरसेवक उदय मडकईकर यांनी सांगितले.

विभागातील कोणीही कनिष्ठ किंवा वरिष्ठ अधिकारी असेल तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली पाहिजे. त्यांना कोणाची भीती नाही. नवीन खर्चाचा अंदाज घेण्यासाठी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये रस्ता हॉटमिक्स करण्या आवश्यक असताना ते मे महिन्यापर्यंत थांबतात आणि मुद्दाम रस्ते मोकळे करतात. याविरोधात मी उच्च न्यायालयात जाईन,’ अशी धमकी मडकईकर यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याची दुरुस्ती करण्यास सांगितले आहे. अभियंता तात्पुरते जानेवारीत खडी, लोबर टाकून तात्पुरती दुरुस्ती केली जाईल, असे अभियंत्याने सांगितले आहे. पाऊस ओसरल्यावर रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यास सांगितले आहे, असे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले.

आपल्याकडे फक्त सुचना आल्या आहेत. आमी इतर नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले. सुमारे ९० गाडेधारांना सामावून घेण्यासाठी

इच्छित स्वच्छता आणि इतर समस्या आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करू,’ असा इशारा महापौरांनी दिला.

हेही वाचा