अनुभवा राजामौलींचा प्रवास ‘मॉर्डन मास्टर्स’मध्ये

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd August, 12:21 am
अनुभवा राजामौलींचा प्रवास ‘मॉर्डन मास्टर्स’मध्ये


नवीन क्राईम थ्रिलर वृंदा ते एसएस राजामौली यांची मॉर्डन मास्टर डॉक्युमंट्री शुक्रवारी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. तर अजय देवगण, तब्बू यांचा औरो मे कहा दम था, उलझ मदर्स इन्स्टिन सारख्या नवीन चित्रपटांचा देखील समावेश आहे.
मॉर्डन मास्टर्स: एसएस राजामौली (नेटफ्लिक्स)
नेटफ्लिक्सचा हा माहितीपट एसएस राजामौली यांच्यावर केंद्रित आहे. ज्यांनी आपल्या कारकिर्दीत खूप मोठा पल्ला गाठला आहे आणि जगभरात एक सर्जनशील चित्रपट निर्माता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. डॉक्युमेंट्रीमध्ये प्रभास, ज्युनियर एनटीआर, राणा दग्गुबती आणि राम चरण यांच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या मुलाखतींचा समावेश आहे.


बाइकराइडर्स (बुक माय शो स्ट्रीम)
ही क्राइम थ्रिलर चित्रपट मिडवेस्टर्न मोटरसायकल क्लबच्या अवतीभवती फिरतो. जे गुन्हेगारी सिंडिकेटमध्ये फसतात आणि त्याच्या सर्व सदस्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. जॉडी कमर, ऑस्टिन बटलर आणि टॉम हार्डी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट जेफ निकोल्सने दिग्दर्शित केला आहे.


उलझ (थिएटर्स)
सुधांशू सारिया दिग्दर्शित, या आगामी स्पाय थ्रिलर चित्रपटामध्ये देशभक्तांच्या कुटुंबातील एका तरुण आयएफआय अधिकाऱ्याची कथा सांगितली आहे. जी तिच्या पोस्टिंगमध्ये एका गुंतागुंतीच्या परिस्थितीत सापडते. या चित्रपटात जान्हवी कपूर, गुलशन देवैया, रोशन मॅथ्यू, राजेश तैलंग आणि आदिल हुसैन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


सेव्हिंग बिकिनी बॉटम: द सँडी चीक्स मूव्ही (नेटफ्लिक्स)
नवीन ओटीटी रिलीजच्या यादीमध्ये लिझा जॉन्सन दिग्दर्शित ॲनिमेटेड चित्रपट सेव्हिंग बिकिनी बॉटम: द सँडी चीक्स मूव्ही शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे कथानक सँडी आणि स्पाँगबॉबवर केंद्रित आहे, जे एक दुष्ट सीईओ बिकिनी बॉटमला पकडतात तेव्हा बचाव मोहिमेला सुरुवात होते.


स्लिपिंग डॉग्ज - लायन्सगेट प्ले
हा एक क्राईम मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे. जो तुम्हाला अखेरपर्यंत खिळवून ठेवतो. हा चित्रपट एका निवृत्त गुप्तहेराभोवती फिरतो. ज्याची स्मरणशक्ती कमी झाली आहे. मात्र तो आपल्याला असलेल्या माहितीच्या मदतीने दशकापूर्वीच्या गुंतागुंतीच्या हत्येचे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करतो.


मदर्स इन्स्टिंक्ट (थिएटर्स)
मदर्स इन्स्टिंक्ट हा अमेरिकन सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. ज्याचे दिग्दर्शन बेनोइट डेलहोम यांनी केले आहे आणि त्यात जेसिका चेस्टेन, ॲन हॅथवे, अँडर्स डॅनिएलसन लाय आणि जोश चार्ल्स यांच्या भूमिका आहेत. हा ऑलिव्हियर मॅसेट-डेपासच्या २०१८ मध्ये फ्रेंच भाषेत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा रीमेक आहे, जो स्वतः बार्बरा एबेल यांच्या २०१२ मध्ये प्रकाशित झालेल्या मदर्स इन्स्टिंक्ट या फ्रेंच कादंबरीचे रूपांतर होता.


वृंदा (सोनीलिव्ह)
त्रिशा कृष्णन अभिनीत या क्राईम थ्रिलर चित्रपटात वृंदा नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची कथा दाखविण्यात आली आहे. जी तिच्या विश्वासांना आव्हान देणारी गुंतागुंतीची केस सोडवण्याचा प्रयत्न करते.


औरो में कहाँ दम था (थिएटर्स)
अजय देवगण, तब्बू, जिमी शेरगिल, शंतनू माहेश्वरी आणि सई मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला औरो में कहाँ दम था हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपटकृष्ण आणि वसुधा यांच्या प्रेमकथेवर आधारीत आहे. कृष्णाच्या हातून खून होताे आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा होते. त्यामुळे ते दोघे वेगळे होतात. दोन दशकांनंतर माफी मिळाल्यानंतर तो तुरुंगातून सुटतो. तो वसुधाला भेटण्यासाठी जातो. जिचे आता दुसऱ्या पुरुषाशी लग्न झाले आहे. हा चित्रपट कृष्णा आणि वसुधाच्या भूतकाळ आणि वर्तमानकाळावर प्रकाश टाकतो.


किंगडम ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स (डिस्ने + हॉटस्टार)
ओटीटी रिलिझमध्ये मॉडर्न मास्टर्स: एसएस राजामौली, द बाइकराइडर्स, वृंदा आणि इतर नवीन ओटीटी रिलिझमध्ये किंगडम ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्सचाही समावेश आहे. ओवेन टीग, फ्रेया एलन, केविन डूरंड, और पीटर मैकॉन अभिनीत, हा चित्रपट एका तरुण चिंपांझीभोवती फिरतो. जो मानव आणि वानर यांचे भविष्य निश्चित करण्यासाठी साहसी प्रवासावर निघतो.

हेही वाचा