पॅरिस ऑलिंपिक २०२४ : मनूनंतर स्वप्नीलने नेमबाजीत पटकावले कांस्य

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
01st August 2024, 02:21 pm
पॅरिस ऑलिंपिक २०२४ : मनूनंतर स्वप्नीलने नेमबाजीत पटकावले कांस्य

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या सहाव्या दिवशी, भारताला ३ पदकांची आस होती. ॲथलेटिक्समध्ये दोन आणि नेमबाजीत एक. यात कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने नेमबाजीतील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन पुरुषांच्या अंतिम फेरीत लक्ष्यवेधी कामगिरी करत कांस्यपदकास गवसणी घातली आहे. यामुळे भारताच्या खात्यात आता एकूण तीन कांस्य पदकांची भर पडली आहे. या आधी हरियाणाच्या मनू भाकरने भारतासाठी नेमबाजीतच २ कांस्य पदकांची कमाई केली होती. Swapnil Kusale 72 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये देशासह महाराष्ट्राचं नाव  उंचवण्यासाठी सज्ज, सामना केव्हा? - Marathi News | Paris olympics 2024 know  who is swapnil kusale their set to ...

'निलिंग'ची अर्थात पहिली फेरी पूर्ण होईपर्यंत स्वप्नील पाचव्या स्थानी होता. स्टँडिंग शॉट्सच्या फेरीत दमदार कामगिरीच्या जोरावर स्वप्नीलने तिसऱ्या स्थानी झेप घेतली. या राऊंडच्या अखेरपर्यंत, यूक्रेनचा खेळाडू पहिल्या, चीनचा खेळाडू दुसऱ्या तर स्वप्नील तिसऱ्या स्थानी होता. सर्वात कमी गुण मिळवलेल्या अन्य दोन खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले व अखेर स्वप्नीलने ऐतिहासिक कांस्य पदकावर शिक्कामोर्तब केले. विशेष बाब म्हणजे खाशाबा जाधव यांच्यानंतर पदक जिंकणारा स्वप्नील महाराष्ट्रातील पहिला खेळाडू ठरला आहे. Paris Olympics Shooting | कोल्हापूरच्या पठ्ठ्याचा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये डंका!  भारताला नेमबाजीत मिळवून दिले तिसरे पदक

आज होणाऱ्या स्पर्धांचे वेळापत्रक 

दुपारी २:३० : महिला बॉक्सर निखत जरीन ५० किलो गटातील १६  च्या फेरीत भाग घेईल.

दुपारी २:३१ : पुरुष तिरंदाज प्रवीण जाधव  वैयक्तिक गटात टॉप ३२ मध्ये आपली ताकद दाखवेल.

दुपारी ३:३० : महिला नेमबाज शिफ्ट कौर समरा आणि अंजुम मौदगील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतील.

दुपारी ३:४५ : नौकायनात, विष्णू सरवणन पुरुषांच्या डिंगी ILCA7च्या पहिल्या आणि दुसऱ्या शर्यतीत भाग घेतील.

सायंकाळी ४:३०: बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहे.

सायंकाळी ७:०५ : नौकायनात, नेत्रा कुमारन महिला डिंगी ILCA6च्या पहिल्या आणि दुसऱ्या शर्यतीत सहभागी होईल.

रात्री १० नंतर: पीव्ही सिंधूचा बॅडमिंटनमधील महिला एकेरीत टॉप १६व्या फेरीचा सामना होईल.