सासष्टी तालुका शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे रेचेल परेरा हिला अजिंक्यपद

जोशुआ मार्क टेलेसला उपविजेतेपद : ‘मनोविकास’ला प्रतिष्ठित ट्रॉफी

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th July, 10:02 pm
सासष्टी तालुका शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे रेचेल परेरा हिला अजिंक्यपद

पणजी : रेचेल परेरा हिने सासष्टी तालुका शालेय विद्यार्थ्यांच्या सराव स्पर्धेत विजय मिळवला. एसएजी मल्टिपर्पज हॉल फातोर्डा गोवा येथे युनिक चेस अकादमी आणि चेस आरसीसी फातोर्डा यांच्यावतीने आयोजित सासष्टी तालुका शालेय विद्यार्थ्यांची जुलै २०२४ सराव स्पर्धा रोमहर्षकपणे पार पडली. प्रेझेंटेशन स्कूलच्या रेचेल परेरा हिने अंतिम फेरीत सत्यम फळचा पराभव करून विजय मिळवला आणि ८ पैकी अचूक ८ गुण मिळवले.

मनोविकास शाळेच्या जोशुआ मार्क टेलेसने ७ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आणि विद्या विकास अकादमीच्या आर्यव्रत नाईक देसाईने ६.५ गुणांसह तिसरे स्थान पटकावले. पहिले १५ विजेते पुढीलप्रमाणे : रेचेल परेरा, जोशुआ टेलेस, आर्यव्रत नाईक देसाई, श्रीया पाटील, अस्मी तेर्से, सत्यम फळ, तंगेश नाईक, सार्थक कवळेकर, विभव केरकर, अद्वैत कामत, स्वयं कोमरपंत, शिनेल रॉड्रिग्स, तनिश बांदोडकर, प्रयांक गावकर, शौर्य साळगावकर.

वय श्रेणीतील विजेते : ७ वर्षाखालील मुले : नारायण प्रभू देसाई, इव्हान अँथोनियो टेलेस, ७ वर्षांखालील मुली : शिवन्या राव, अर्ना जोशी, ९ वर्षाखालील मुले : स्वयं कारापूरकर, सॅनियो सिल्वेरा, ९ वर्षांखालील मुली : जेनेली वाझ, आराध्या पार्सेकर, ११ वर्षांखालील मुले : अथर्व बोरकर, नॅथन कार्दोझ, ११ वर्षांखालील मुली: जिया नार्वेकर, स्कायला रॉड्रिग्स, १३ वर्षांखालील मुले: तापस्य भट, दक्ष मेती, १३ वर्षांखालील मुली: सेरेना व्हिएगास, मेहता श्रावी, १५ वर्षांखालील मुले: सुखम सावंत, साहिल नाईक, १५ वर्षांखालील मुली : आदिती कामत, अवनी कामत.

सर्वोत्कृष्ट आरसीसी खेळाडू : रेचेल परेरा, हेरंब गावकर, प्रणिश नाईक, यज्ञ प्रभुदेसाई, गौरिक चोडणकर.

मनोविकास स्कूल आणि विद्या विकास अकादमी या दोन्ही शाळांमध्ये प्रत्येकी १६ स्पर्धक होते. तथापि, गुणांनी मनोविकास शाळेला प्रतिष्ठित ट्रॉफी मिळवून दिली. महिला आणि नूतन शाळेचा १५ विद्यार्थ्यांसह प्रशंसनीय सहभागाबद्दल विशेष उल्लेखनिय होता.

प्रमुख पाहुणे गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव आशेष केणी यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. दामोदर झांबावलीकर (उपाध्यक्ष जीसीए), मंथन अडपाईकर (टीएसओ डीएसवायए सासष्टी), आयए संजय कवळेकर (टूर्नामेंट डायरेक्टर), अमृत नाईक (अध्यक्ष युनिक चेस अकादमी), एसएनए तनिष्क कवळेकर (मुख्य आर्बिटर), सचिंद्र नाईक, प्रीती मेंडेस (उपमुख्य आर्बिटर) आणि सौरभ कामत या मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी बक्षिसे प्रदान केली.