धक्कादायक अहवाल; जगभरात भुकेने तडफडतायत तब्बल २८.२ कोटी लोक

युएनच्या ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिस मध्ये खुलासा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
26th April, 11:50 am
धक्कादायक अहवाल; जगभरात भुकेने तडफडतायत तब्बल २८.२ कोटी लोक

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांत मध्य आफ्रिका, मध्यपूर्व आशिया आणि ईशान्य युरोपमधील तणावग्रस्त स्थितीत लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे. युएनने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार याच तणावग्रस्त परिस्थितीमुळे २०२३ साली देशातील तब्बल ५९ देशांतील अंदाजे २८.२ कोटी लोक उपासमारीचे शिकार बनले. इस्रायल आणि पेलेस्टाईनच्या वादामुळे उपासमारीचा सर्वाधिक त्रास गाझामधील लोकांना सहन करावा लागला. Global Food Crisis: संयुक्त राष्ट्र की UNDP Report से सामने आया निष्कर्ष  वैश्विक महंगाई का भारतीय गरीबों पर असर नहीं - Global Food Crisis The  conclusions revealed by the recent ...

यूएनने प्रसिद्ध केलेल्या ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिस या अहवालात उपासमारीची मुख्य कारणे ही सदर भागांत फोफावलेला दहशतवाद, युद्धजन्य स्थिती  तसेच दुष्काळासारख्या नैसर्गिक परिस्थिती असल्याचे स्पष्ट केले आहे. Hochwertiger Reis für Afrika - giz.de

अहवालानुसार, २०२२ मध्ये तब्बल २.४ कोटी लोकांना भीषण अन्नटंचाईचा सामना करावा लागला. याचमुळे गाझा आणि सुदानमध्ये अन्नसुरक्षेचा गंभीर मुद्दा उपस्थित झाला. युएनच्या खाद्य आणि कृषी संघटनेचे मुख्य अर्थशास्त्री मॅक्सीमो टोरेरो यांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तज्ञांनी तयार केलेल्या भुकेच्या प्रमाण मापदंडानुसार पाच देशातील सुमारे ७ लाख ५ हजार लोक पाचव्या टप्प्यात आहे. UN appeals for aid for "traumatised" Somalis who are hungry | Africanews

भूकबळींची वाढती संख्या चिंता वाढवणारी 

अर्थशास्त्री मॅक्सीमो टोरेरो यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ ला भुकेच्या प्रमाणाचे मूल्यमापन सुरू झाल्यापासून  उपासमारीमुळे प्रभाविक लोकांची संख्या ही २०२४ मध्ये लक्षणीयरीत्या वाढली आहे. More countries are sliding into acute food insecurity, UN hunger hotspots  report warns | World Food Programme

भीषण दुष्काळाचा फटका संभवतो 

युएनच्या अहवालानुसार, दक्षिण सुदान, बुर्किना फासो, सोमालिया आणि मालीमध्ये हजारो लोक उपासमारीने त्रस्त आहेत. अहवालात नोंदवलेल्या भविष्यातील परिस्थितीचा अंदाजानुसार गाझामधील ११ लाख लोक आणि दक्षिण सुदानमधील ७९ हजार लोक जुलैपर्यंत ५ व्या टप्प्यात पोहोचू शकतात. २०१६  मध्ये नोंदवलेल्या संख्येच्या तुलनेत त्यात चार पट वाढ झाली आहे. अर्थतज्ञ म्हणाले की पाच देशांतील तब्बल टक्के ८० टक्के लोकसंख्या सद्यघडीस तीव्र दुष्काळाचा सामना करत आहे, त्यातील अंदाजे ५ लाख ७७ हजार लोक एकट्या गाझामध्ये आहेत. Israel steps up strikes across Gaza, orders new evacuations in north |  Reuters

हेही वाचा