'डबल इंजिन' सरकार मध्य प्रदेशात दुप्पट वेगाने काम : मोदी

राज्यासाठी ७,५५० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
11th February, 03:04 pm
'डबल इंजिन' सरकार मध्य प्रदेशात दुप्पट वेगाने काम : मोदी

झाबुआ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मध्य प्रदेशातील झाबुआला भेट दिली आणि राज्यासाठी ७,५५० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, मी झाबुआमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नाही तर तुमचा 'सेवक' म्हणून आलो आहे. आमचे 'डबल इंजिन' सरकार मध्य प्रदेशात दुप्पट वेगाने काम करत आहे.

मध्य प्रदेशातील आदिवासींच्या सभेत मोदी म्हणाले, आम्ही 'सिकलसेल अॅनिमिया' विरुद्धची मोहीम मतांसाठी नव्हे, तर आदिवासींच्या आरोग्यासाठी सुरू केली. भाजपला लोकसभेच्या ३७० जागा जिंकण्यासाठी मोदींनी मतदारांना गेल्या निवडणुकीच्या तुलनेत प्रत्येक बूथवर ३७० अतिरिक्त मतांची खात्री करण्यास सांगितले. पंतप्रधान आणि संसदेतील विरोधी पक्षनेतेही आता एनडीएसाठी “अबकी बार ४०० पार” असे म्हणत आहेत.

काँग्रेसवर ताशेरे ओढत मोदी म्हणाले, काँग्रेसने इतकी वर्षे राज्य केले आणि त्यांना काम करण्याची संधी मिळाली पण केवळ १०० एकलव्य शाळा उघडल्या गेल्या. भाजप सरकारने गेल्या दहा वर्षांत चारपट एकलव्य शाळा उघडल्या. एकही आदिवासी मुलगा शिक्षणाअभावी वंचित राहता नये. हजारो वर्षांपासून आपला आदिवासी समाज वनसंपत्तीतून जीवन जगत आहे.

काँग्रेसच्या काळात आदिवासींच्या हक्कांच्या कायदेशीर संरक्षणासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले. वन मालमत्ता कायदा, आमच्या सरकारने वनजमिनीसंबंधीचे अधिकार आदिवासी समाजाला परत केले. इतकी वर्षे आदिवासी कुटुंबांमध्ये सिकलसेल अॅनिमियामुळे दरवर्षी शेकडो लोकांचा मृत्यू होत होता. काँग्रेसने केंद्रात आणि राज्यात इतकी वर्षे सरकार चालवले, पण अकाली मृत्यूमुखी पडणाऱ्या आदिवासी तरुण-तरुणींची त्यांना पर्वा नाही, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा