बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम आणि चित्रपट निर्माता आदित्य धर यांनी त्यांच्या आगामी चित्रपट 'आर्टिकल ३७०' च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात एक गोड बातमी दिली. या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाच्या आगमनाची अधिकृत घोषणा केली आहे. या खास प्रसंगी या जोडप्याने ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे, ज्यामध्ये यामी सध्या साडेपाच महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले आहे.
या खास प्रसंगी आपला आनंद व्यक्त करताना आदित्य धर म्हणाला, मुलाचे आगमन होणार आहे. हा चित्रपट ज्या प्रकारे बनवला गेला आणि ज्या प्रकारे आम्हाला त्याबद्दल माहिती मिळाली, तो एक आश्चर्यकारक काळ होता.
यामी आणि आदित्यच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत. या जोडप्याने जून २०२१ मध्ये लग्न केले. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर यामी मे महिन्यात मुलाला जन्म देईल. ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाविषयी सांगायचे तर, यामी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्यने केली आहे. आता ही जोडी प्रमोशनमध्ये एकत्र दिसणार आहे. २३ फेब्रुवारीला आर्टिकल ३७० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर यामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होणार आहे.