कोविडविरुद्ध आपली लढाई अजून संपलेली नाही, देशभरात सापडले ८८ रुग्ण

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
03rd December 2023, 12:06 pm
कोविडविरुद्ध आपली लढाई अजून संपलेली नाही, देशभरात सापडले ८८ रुग्ण

नवी दिल्ली : २०२० साली संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले होते . कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला. लसीकरणानंतर काहीसा दिलासा मिळाला आहे. कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी ही महामारी पूर्णपणे संपलेली नाही. भारतात कोरोनाचे ८८ नवीन रुग्ण आढळले आहेत. 

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आकडेवारी  

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे की देशात ३९६  कोरोनाग्रसीत रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनामुळे जीव  गमावलेल्या लोकांची एकूण संख्या ५,३३,३०० आहे, तर कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या ४,५०,०२,१०३  आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, संसर्गातून बरे झालेल्या लोकांची एकूण संख्या ४,४४,६८,४०७  झाली आहे.

त्याच वेळी, देशात संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण ९८.८१  टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण १.१९  टक्के आहे. वेबसाइटनुसार, भारतात आतापर्यंत कोविड-१९  लसीचे एकूण २२०.६७  कोटी पेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत.

शिमल्यात गुरुवारी महिलेचा मृत्यू झाला 

शिमला येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात  नुकतेच एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा गुरुवारी मृत्यू झाला. महिलेचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

हेही वाचा