विश्वचषक अंतिम सामना पाहू नका!; चाहत्यांची अमिताभ बच्चन यांना विनंती

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
16th November, 08:22 pm
विश्वचषक अंतिम सामना पाहू नका!; चाहत्यांची अमिताभ बच्चन यांना विनंती

विश्वचषकातील उपांत्य फेरीत टीम इंडियाच्या नेत्रदीपक विजयावर बॉलीवूडच्या सर्वच सिनेतारकांनी आनंद व्यक्त केला असून टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. अमिताभ बच्चन यांनीही विजयासाठी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे, मात्र मेगास्टारच्या या ट्विटनंतर लोक त्यांना फायनल न पाहण्याचे आवाहन करत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी केले ट्विट

टीम इंडियाच्या विजयानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले होतं की, 'जेव्हा मी सामना पाहत नाही आम्ही जिंकतो!' या ट्विटनंतर अमिताभ बच्चन चर्चेत आले आहे. त्यांच्या पोस्टवर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. काही लोक त्यांना पनौती असेही म्हणत आहेत. बिग बींचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.

काय आहेत प्रतिक्रिया?

अमिताभ बच्चन यांच्या ट्विटवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'बच्चन साहेब, १४० कोटी देशवासीयांना तुमच्याकडून फक्त एक बलिदानाचा दिवस हवा आहे. तुमचा सामना न पाहणे हे भारतीय संघासाठी भाग्यवान सिद्ध होते. अजून एक दिवस...!’

आणखी एका यूजरने लिहिले, 'फायनल बघू नका, बाबूजी तुम्हाला शपथ देतो.' रोहित नावाच्या यूजरने लिहिले, 'बच्चन साहेब, १९ नोव्हेंबरला डोळ्यांवर काकडी लावून तळघरात झोपा. फटाक्यांचा आवाज आला तरच बाहेर या.