किंग कोहलीच्या घरात गणेशोत्सवाची लगबग

अनुष्का शर्माने शेअर केला फोटो

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
18th September 2023, 08:23 pm
किंग कोहलीच्या घरात गणेशोत्सवाची लगबग

मुंबई : गणपतीच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना सध्या घरोघरी आणि गल्लीबोळात असणाऱ्या मंडळांमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. किंग कोहली अर्थात विराट-अनुष्काच्या घरातही हीच परिस्थिती आहे. कारण, तिच्या घरातही सामानाची जागा बदली आहे. त्यामुळे अनुष्काला थेट घराच्या जीममध्येच बसून एक फोटो काढण्याची सवड मिळाली आहे. फोटो इन्स्टा स्टोरीतून शेअर करताना अनुष्कानं कॅप्शनमध्ये लिहिले, 'ज्यावेळी तुम्हाला घरातील फर्निचर गणपतीसाठी हलवावे लागते आणि जीम ही एकमेव जागात उरते'.

अनुष्काने ज्या क्षणी तिच्या घरातील गणपतीच्या तयारीचा फोटो शेअर केला त्या क्षणापासून अनेकांनीच तिच्या या फोटोशी सहमत होत अरेच्छा! आमच्या घरातही काहीशी अशीच परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. तिच्या अवतीभोवती दिसणारा पसारा पाहून आपल्या घरातही काहीसे असेच चित्रे होते, अशा कमेंट्स फॉलोअर्सनी केल्या. थोडक्यात काय, तर इथे सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य अशी दरी राहिली नाही. कारण गणपतीच्या बाबतीत तुमचं आमचं सेम असतं... नाही का?