डॉ. फिलिप पिंटो टेबल टेनिस स्पर्धेला प्रतिसाद

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
18th September, 08:21 pm
डॉ. फिलिप पिंटो टेबल टेनिस स्पर्धेला प्रतिसाद

वास्काे : कबीर पिंटो माखिजा यांनी क्लब वास्को द गामा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचव्या डॉ. फिलिप पिंटो मेमोरियल ऑल गोवा टेबल टेनिस स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. ही स्पर्धा १६ सप्टेंबर रोजी क्लबच्या आवारात आयोजित केली होती.

यावेळी गौरमांगी सिंग, भारतीय माजी व्यावसायिक फुटबॉलपटू आणि सध्या एफसी गोवाचे सहाय्यक प्रशिक्षक हे प्रमुख पाहुणे होते आणि नितीन बांदेकर, उद्योगपती आणि वास्को स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : सुपर ग्रुप प्रकारात प्रशांत कामत आणि हेमंत रामाणी यांनी जॉन झेवियर आणि विकास प्रभू यांचा ३-१ असा पराभव केला.

उपांत्य निकाल - जॉन झेवियर आणि विकास प्रभू यांनी राज लोटलीकर आणि मोहम्मद मजार शेख यांचा ३-२ असा पराभव केला.

प्रशांत कामत आणि हेमंत रामाणी यांनी डॉ. ब्रेनन टावरेस आणि पीटर कॉर्डेरो यांचा ३ - ० पराभव केला.

एलिट गटात अमित नाईक आणि झिस्टो फर्नांडिस यांनी सचिन सोरेस आणि राजेंद्र पार्सेकर यांचा ३-१ असा पराभव केला.

उपांत्य निकाल -

सचिन सोरेस आणि राजेंद्र पार्सेकर यांनी युसूफ शेख आणि राजेंद्र नाईक यांचा ३-२ असा पराभव केला.

अमित नाईक आणि झिस्टो फर्नांडिस यांनी जोसेफ सिक्वेरा आणि संजय संकल्प यांचा ३-१ असा पराभव केला.