केपे येथे अटल ग्रामतर्फे माटोळीचा शुभारंभ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th September 2023, 11:45 pm
केपे येथे अटल ग्रामतर्फे माटोळीचा शुभारंभ

 केपे येथील अटल ग्राम आयोजित माटोळीचा शुभारंभ करताना मंत्री सुभाष फळदेसाई. सोबत आमदार एल्टन डिकॉस्ता.

केपे : महिलांना मार्केट मिळवण्याकरता मुख्यमंत्र्यांतर्फे ई-मार्केट सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. केपे येथे अटल ग्रामतर्फे आयोजित करण्यात आलेल्या माटोळीच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार एल्टन डिकॉस्ता, जि.पं. सदस्य संजना वेळीप, सुरेश केपेकर, सरपंच भूपेंद्र गावस देसाई, प्रसाद फळदेसाई, आलिन्डा लासेन्डा, जेकिना डायस, सुभाष वेळीप, संतोष फळदेसाई, दीपाली नाईक, नीता फळदेसाई आदी ‌उपस्थित होते.
ग्रामीण भागातील लोकांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. ३ हजारपेक्षा जास्त महिला या संस्थेशी निगडित आहेत. ३०० हून जास्त ग्रुप आहेत. तसेच महिलांना व्यवहार ज्ञान मिळणे गरजेचे आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले. कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवला तरच आपण पुढे जाऊ शकताे यासाठी विश्वास खूप महत्त्वाचा आहे. बाहेरील देशातून गोव्यात अनेक लोक येतात, तेव्हा फाईव्ह स्टारसारख्या हॉटेल्सनी अशा प्रकारचे स्टॉल घातले पाहिजे.
सण साजरे करताना देवाची शिकवण आपण आत्मसात करून त्यामार्गे वाटचाल करायला हवी. गणरायाने निर्सग संवर्धनाचा संदेश दिला आहे. त्यासाठी पर्यावरण राखणे गरजेचे आहे, असे आमदार डिकॉस्ता यांनी सांगितले.

चतुर्थी, ख्रिस्मस किंवा ईद असू दे आम्हा गोवेकरांना एकसंघाने पुढे गेले पाहिजे. सर्व एकत्रितरीत्या पुढे जातील तेव्हाच आमचा गाव, मतदारसंघ, राज्य व देश पुढे जाईल. केपेचा मतदार पुढे जाण्याकरता मंत्री म्हणून सुभाष फळदेसाई यांचा सल्ला महत्त्वाचा आहे. _एल्टन डिकॉस्ता, आमदार, केपे