काँग्रेस नेते शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान


12th August 2022, 12:12 am
काँग्रेस नेते शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान

दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना त्यांच्या लेखन आणि भाषणांसाठी फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘चेव्हलियर दे ला लीजन डी' ऑनर (द लीजन ऑफ ऑनर) मिळाला आहे. नेपोलियन बोनापार्टने १८०२ मध्ये स्थापित केलेला फ्रेंच ऑर्डर ऑफ मेरिट उत्कृष्ट नागरी किंवा लष्करी वर्तनासाठी हा पुरस्कार देण्यात प्रदान केला जातो. या सन्मानाच्या घोषणेनंतर ट्विटरवर थरूर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, थरूर यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

थरूर यांनी या सन्मानाबद्दल फ्रान्स सरकारचे आभार व्यक्त केले आहेत. यापूर्वी, २०१० मध्ये, थरूर यांना स्पॅनिश सरकारकडून असाच सन्मान मिळाला होता, जेव्हा स्पेनच्या राजाने त्यांना ‘एन्कोमिंडा डे ला रिअल ऑर्डर एस्पॅनोला डी कार्लोस’ बहाल केला होता.

थरूर हे तिरुअनंतपुरम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे दोन वेळा लोकसभेचे खासदार आहेत आणि परराष्ट्र व्यवहारावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी यापूर्वीच्या युपीए सरकारमध्ये मनुष्यबळ विकास राज्यमंत्री आणि परराष्ट्र राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.