लाल सॉस पास्ता

Story: अन्नपूर्णा | स्वप्ना नाईक |
24th June 2022, 10:07 pm
लाल सॉस पास्ता

लहान मुलांच्या पार्टीसाठी एक परिपूर्ण डिश जे आधीपासून घरी असलेल्या घटकांसह करता येते.

साहित्य :  १०० ग्रॅम पास्ता कोणत्याही आकाराचा,  ४ टोमॅटो

 १ छोटा कांदा,  लसूण ३ पाकळ्या,  १ टीस्पून मिरची पावडर,  १/२ टीस्पून साखर,  १ टीस्पून मिक्स हर्ब्स,  १ चीज क्यूब ३० ग्रॅम,  चवीनुसार मीठ

कृती : एका मोठ्या पातेल्यात १ लिटर पाणी उकळून त्यात पास्ता टाका. पास्ता उकळत असताना थोडे मीठ आणि १ चमचा तेल घालावे. पास्ता बाजूला काढून ठेवा. दरम्यान ४ टोमॅटो उकळवा आणि त्यांच्या साली काढून घेऊन ते  मिक्सरमधून बारीक पेस्ट बनवून ठेवा.

मुख्य कृती :  एका कढईत १ चमचा तेल घालून लसूण आणि कांदा पारदर्शक होईपर्यंत परतून घ्या. टोमॅटो पेस्ट मंद आचेवर थोडी घट्ट होईपर्यंत शिजवा, चीज क्यूब वगळता बाकीचे सर्व साहित्य त्यात टाका.  गरमागरम तयार सॉसमध्ये पास्ता घालून प्लेटमध्ये मस्त चीज घालून गरमागरम सर्व्ह करा.