इंटेलने केलेली शांतीत क्रांती : Aldar Lake 12th जनरेशन प्रोसेसर अन् त्यासोबत येणारी इत्यंभूत माहिती

मागील भागात आपण जाणून घेतले Aldar lake मधल्या H P U सारख्या प्रोसेसरबद्दल. तर आज आपण पाहू की गेल्या जनरेशनमध्ये ( टायगर लेक) अन् आताच्या जनरेशन ( अल्डर लेक) मध्ये काय फरक आहे. तसेच आपण AMD Vs intel ह्या जुन्या स्पर्धकांमधल्या कधीच न संपणाऱ्या स्पर्धेबद्दल सुद्धा जाणून घेऊया.

|
18th June 2022, 11:56 Hrs
इंटेलने केलेली शांतीत क्रांती : Aldar Lake 12th जनरेशन प्रोसेसर अन् त्यासोबत येणारी इत्यंभूत माहिती

तसे बघायला गेल्यास, aldar लेक 'नाका पेक्षा मोती जड' असाच आहे. त्याची पॉवर जनरेशन, त्याची क्रुसरबिलिटी अन् पॉवर रेटन करण्याची क्षमता हे सगळेच काही म्हणजे टेक्नॉलॉजीच्या प्रगतीचे कहर आहे. जवळजवळ १६-१८ महिन्यांपूर्वी आलेला टायगर लेक व ३ महिन्यांपूर्वी आलेला अल्दार लेक ह्यात फरक म्हणजे

१) अल्डारा लेक हा पूर्ण जोमाने काम करतो. मग ते साधे read and write का असेना. (जरी Ghz सारखे मानक सरसकट सगळ्याच गोष्टींसाठी पूरक नसले तरी आपली गरज ओळखून बेंचमार्क रन करून पाहिलेले केव्हाही चांगले.)

२) LPDDR ५ ची कार्य क्षमता असलेली RAM. 

३) ८ परफॉर्मन्स कोअर अन् ८ efficient core ची overkill क्षमता.

४) ह्याचे efficient core एवढे कार्यक्षम आहेत की बऱ्याच कामांमध्ये परफॉर्मन्स कोअरची गरजसुद्धा नाही भासणार.

५) अभूतपूर्व असे बॅटरी बॅकअप अन् त्यातल्या त्यात P सिरीजचे इन्कल्युजन ज्यात बॅटरीची क्षमता ही  गरजेपेक्षा जास्त बचत करणारी आहे (फक्त ९w ची TDP) (माणसाला येवढ्या comfort ची गरजच काय आहे म्हणतोय मी) पण शेरास सव्वाशेर हा असतोच. आता AMD जेव्हा ६००० / ७००० सिरीज घेऊन येईल जुलैच्या तिसर्‍या आठवड्यात, तेव्हा जी personal Computer क्षेत्रात तुंबळ मारामारी होणार ती न भूतो न भविष्यती अशीच असेल. एकीकडे cryptoचे वारे थंड होत असल्याकारणाने high yield processor आणि graphics Card ह्याच्या किमतीसुध्दा पुन्हा स्वस्त होत आहेत, तर दुसरीकडे AMD / intel नवेनवे प्रयोग करून techno enthusiast लोकांकरिता मेजवानीच घालत आहे.

आता AMD ह्यांचा उल्लेख आलाच आहे तर आज होऊनच जाऊ दे!

१) १२ जन आल्डर लेक हा ५००० सिरीजपेक्षा उजवा ठरतो तो त्याच्या नव्या प्रोसेसिंग प्रणालीमुळे.

२) AMDला जवळजवळ सगळ्याच श्रेणीत गाठू लागल्यामुळे हा वरचढ ठरतोय तरी AMD कडे अशी गोष्ट आहे जी इंटेल मनात आणले तरी करू शकत नाही. इंटेल हा टेक्नॉलॉजीमधल्या बदलांचे द्योतक आहे, म्हणजे इंटेल हा बदलत राहतो. उलट AMD २०११ पासून त्याच मोड्युलवर आधारित motherboard बनवत आहे. AMD यामुळे जरी मागे राहिला असे वाटले तरी तो काही जास्त मागे नाहीच मुळी.

३) AMDची अलिकडची सिरीज ही ऑक्टोबर २०२१ मध्ये आली जी ५००० सिरीज होती. बऱ्याचदा जेव्हा टेस्ट केली गेली तेव्हा असे दिसून आले की AMDची प्रणाली जास्त टिकाऊ आहे (ती आहेच !)

४) AMDमधले जे काही प्रोसेसर आहेत ते इंटेलपेक्षा खूप कमी पॉवर कन्ज्यूम करतात पण काम भरपूर करतात. AMD मध्ये ७ nm ह्या मापाचे प्रोसेसर होऊ लागले आहेत तरीही इंटेल अजून १०.५ nm ह्याच die मध्ये प्रोसेसर छापतो आहे.

५) तरीही aldar लेकच्या आगमनामुळे इंटेलला जरा आराम आहे, नाहीतर २०१८ मध्ये जेव्हा AMDने ५६% मार्केट काबीज केले तेव्हा असे वाटले की इंटेलला घरघर लागली की काय?

६) इंटेलसाठी सध्या जमेची बाजू म्हणजे त्याच्याकडे असलेली PCIE ५ची मदत जी २०२० मधले PCIE ४ वापरणाऱ्या AMDकडे तूर्तास तरी नाही.

कितीही तुंबळ हाणामारी असो, जोपर्यंत कुणी तिसरा खिलाडी ह्या प्रोसेसर्सच्या खेळात उडी घेत नाही तोपर्यंत, इंटेल आणि AMD एकमेकास पूर्णपणे धोबीपछाड देऊच शकत नाही.

आता पुढच्या भागात असेच काही तरी भन्नाट तुमच्यासाठी घेऊन येवू.

लोभ असावा.