नुपूरचे वक्तव्य; हिंसक निषेध नको!

- जमात उलेमा ए-हिंदचे बांधवांना आवाहन

Story: दिल्ली : |
14th June 2022, 12:54 am
नुपूरचे वक्तव्य; हिंसक निषेध नको!

दिल्ली : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर देशात मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. पैगंबरांच्या नावाखाली देशात चाललेला हिंसक निषेध सहन करणार नसल्याचे जमात उलेमा ए-हिंद या संघटनेने जाहीर केले आहे. इस्लामिक तत्वानुसार नुपूर शर्मा यांना माफ करायला हवे, असे आवाहन त्यांनी मुसलमान बांधवांना केले आहे.
जमातचे अध्यक्ष सुहैब म्हणाले की, आम्हाला देशभरात सुरू असलेला हा हिंसाचार मान्य नाही. तसेच भाजपने नुपूर शर्मांना निलंबित केलं याचे आम्ही स्वागत करतो; पण इस्लामिक तत्वानुसार नुपूर शर्माला माफ केले जावे. भारतात कायद्याचे राज्य आहे. मात्र, रस्त्यावर उतरून नियम तोडायला आम्ही परवानगी देऊ शकत नसल्याचेही सुहैब म्हणाले. आम्ही याबाबत फतवा काढणार असल्याचेही सुहैब म्हणाले.

ओवेसी, मदानी विरोधात फतवा काढणार
लोकांनी कोणत्याही हिंसाचारला पाठिंबा देऊ नये. आम्ही असदुद्दीन ओवेसी आणि मोहम्मद मदानी यांच्याविरोधातही फतवा काढणार असल्याचे सुहैब म्हणाले. तसेच सरकारने मुस्लिम संघटना आणि त्यांना पैसे पुरवणाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी सुहैब यांनी केली आहे.