मोदी सर्वाधिक लोकप्रिय नेते

|
21st January 2022, 11:42 Hrs
मोदी सर्वाधिक लोकप्रिय नेते

न्यूयॉर्क : देशातील प्राणघातक करोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवडले गेले आहेत. अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म 'द मॉर्निंग कन्सल्ट'च्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता रेटिंगमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बिडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह जगातील १३ राष्ट्रप्रमुखांना मागे टाकले आहे.

सर्वेक्षणात मोदींचे अप्रूव्हल रेटिंग ७१ टक्के आहे. १३ ते १९ जानेवारी दरम्यान झालेल्या या सर्वेक्षणात भारताचे पंतप्रधान जगातील अनेक राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या तुलनेत खूप पुढे आहेत.