लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा

|
19th January 2022, 11:29 Hrs
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा

मुंबई : गायिका लता मंगेशकर दीर्घकाळापासून रुग्णालयात दाखल आहेत. कोविड आणि न्यूमोनियाच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांची तब्येत सुधारत आहे.

लता मंगेशकर यांच्या तब्येतीचे अपडेट्स हॉस्पिटल आणि त्यांच्या कुटुंबाकडून रोज मिळत राहतात. लता मंगेशकर यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, लताजींची प्रकृती आता ठीक आहे. डॉक्टर बोलतील तेव्हा त्यांना घरी आणले जाईल.

२ दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की लता मंगेशकर यांची तब्येत बिघडत आहे, त्यानंतर प्रवक्त्याने हे सर्व रिपोर्ट्स चुकीचे असल्याचे सांगितले होते आणि त्या ठिक आहेत आणि सध्या आयसीयूमध्ये असल्याचे सांगितले होते.