देशात नव्या करोनाबाधितांचा आकडा ३ लाखांच्या नजीक

|
19th January 2022, 11:25 Hrs
देशात नव्या करोनाबाधितांचा आकडा ३ लाखांच्या नजीक

नवी दिल्ली : बुधवारी पुन्हा एकदा देशात करोना विषाणूच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात २,८२,९७० नवीन कोविड-१९ बाधितांची नोंद झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत ही नोंद १८ टक्के अधिक आहे.       

मंगळवारी २,३८,०१८ लाख प्रकरणे नोंदवण्यात आली. पॉझिटिव्हिटी दर १४.४३ टक्क्यांवरून १५.१३ टक्के झाला आहे. त्याच वेळी, एका दिवसात ४४१ रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. या महामारीमुळे आतापर्यंत एकूण ४,८७,२०२ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.      

ओमिक्रॉन या नवीन व्हेरियंटच्या बाबतीतही बुधवारी तेजी दिसून आली आहे. देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचे ८,९६१ रुग्ण आढळले आहेत. देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेला ओमिक्रॉन कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.  आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, नवीन बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या कमी असल्याने गेल्या २४ तासांत सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. सध्या देशात १८,३१,००० रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत. एकूण बाधितांपैकी ४.८३ टक्के सक्रिय बाधित आहेत. सध्या रिकव्हरी रेट ९३.८८ टक्के आहे. गेल्या २४ तासांत १,८८,१५७ रुग्ण बरे झाले आहेत, तर आतापर्यंत एकूण ३,५५,८३,०३९ लोक संसर्गातून बरे झाले आहेत. 

कर्नाटक सरकार वीकेंड कर्फ्यूसह कोविड-१९ निर्बंध शिथिल करण्यावर पुनर्विचार करेल आणि २१ जानेवारी रोजी निर्णय घेईल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी सांगितले. करोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दैनंदिन कामाला सुरुवात केली.