उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसच्या १२५ उमेदवारांची नावे जाहीर

|
13th January 2022, 10:56 Hrs
उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसच्या १२५ उमेदवारांची नावे जाहीर

लखनऊ : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका वाड्रा यांनी गुरुवारी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या १२५ उमेदवारांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत ४० टक्के महिलांना तिकीट देण्यात आले आहे. महिलांच्या नावांची घोषणा करताना प्रियांका वाड्रा म्हणाल्या की, या सर्व महिला संघर्ष करणार आहेत. मोठी गोष्ट म्हणजे काँग्रेसने उन्नाव बलात्कार पीडितेची आई आशा देवी यांनाही तिकीट दिले आहे.

पत्रकार परिषदेत प्रियंका वाड्रा म्हणाल्या, १२५ उमेदवारांच्या यादीत ५० महिला आहेत. संपूर्ण राज्यात संघर्ष करणारे आणि नव्या राजकारणाची सुरुवात करणारे उमेदवार असावेत, असा आमचा प्रयत्न आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही यूपीच्या राजकारणाला नवी दिशा देऊ शकू, असा आमचा प्रयत्न आहे.