दिल्ली पोलिसांच्या मॉड्युलचे अन्य राज्यांनी अनुकरण करावे!

Story: दिल्ली : |
07th December 2021, 01:21 Hrs
दिल्ली पोलिसांच्या मॉड्युलचे अन्य राज्यांनी अनुकरण करावे!

दिल्ली : महिलांवरील हल्ले, अत्याचार रोखण्यासाठी संसदीय स्थायी समितीने सर्व राज्यांना दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अॅनॅलिटिकल मॉडेलचे अनुकरण करण्याचा सल्ला दिला आहे. राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना सूचना करताना केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, महिलांवरील अत्याचार व तत्सम गुन्हे यांना आळा घालण्यासाठी दिल्ली पोलिसांनी खास गुन्हेगारी ट्रॅकिंग नेटवर्क आणि सिस्टम तयार केली आहे. महिलांवर अत्याचार घडल्यास तक्रार नोंदवण्याच्या प्रक्रियेला उशिर होता नये याची खबरदारी घेत विशेष मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत. त्याच वापर केल्याने चांगले परिणाम दिसून आले आहेत. या प्रणालीचा राज्यांनी वापर करावा.