जॅकलिन फर्नांडिसला ‘ईडी’कडून झटका; लूकआऊट नोटीस

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला रविवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर विदेशात जाण्यापासून रोखण्यात आले. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती विदेशात जात होती. २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तिला रोखण्यात आले आहे.

Story: नवी दिल्ली : |
06th December 2021, 12:53 Hrs
जॅकलिन फर्नांडिसला ‘ईडी’कडून झटका; लूकआऊट नोटीस

नवी दिल्ली :  बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला रविवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर विदेशात जाण्यापासून रोखण्यात आले. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती विदेशात जात होती. २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तिला रोखण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) तिच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली आहे.
दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखर या आरोपीने केलेल्या २०० कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात जॅकलीन ही महत्त्वाची साक्षीदार आहे. जॅकलिनवर सुकेशची गर्लफ्रेंड असल्याचा आरोप आहे आणि यादरम्यान त्याने जॅकलिनला अनेक महागडे गिफ्ट्सही दिले आहेत, असे ईडीचे म्हणणे आहे. जॅकलिनला ५२ लाख रुपयांचा घोडा आणि चार पर्शियन मांजरी भेट दिल्या होत्या. एका मांजरीची किंमत ९ लाख रुपये आहे, असा खुलासा चंद्रशेखरने चौकशीदरम्यान केला आहे. चंद्रशेखर आणि जॅकलिन अतिशय जवळ असल्याचे अनेक फोटोही ईडीला पुरावे म्हणून मिळाले आहेत. ईडीने ऑगस्टमध्ये जॅकलीनचीही चौकशी केली होती. या प्रकरणी ईडीने सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी लीना मारिया पॉल आणि इतर सहा जणांविरुद्ध ७,००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.