वारस

पराक्रमाचा, शौर्याचा इतिहास लाभलेली ही भारतभूमी. आपणाला ठरवावे लागेल कोणाच्या वारसाला महत्त्व द्यायचे ते…

Story: ललित । सीए राधिका कुलकर्णी-काळे, फोंडा |
19th November 2021, 11:58 pm
वारस

आजकाल कोणतीही बातमी बघा. ठळक पणे कुठेतरी आर्यन खान,सुपुत्र शाहरुख  खान यांची बातमी असते.तो किती दिवस अटकेत असेल,त्याने कारागृहात काय  खाल्ले,कसा झोपला,वगैरे वगैरे.मग त्याचे आई बाबा सॉरी सॉरी किंग खान आणि क्वीन  खान कसे दुःखात आहेत वगैरे . फिल्म इंडस्ट्रीमधील बरीच लोकं त्याची बाजू घेऊन बोलतानाही दिसतात.तो अजून लहान आहे,त्याला सावरायला वेळ द्या ,त्याला टार्गेट केलं जातंय वगैरे ...अरे २३ वर्षे वय.हा काय लहान मूल आहे का ?इथे मिसरूड  न फुटलेली मुले सैन्यात भरती होतात आणि हौतात्म्य पत्करतात.त्यांचे काय .त्यांच्या कुटुंबाचे दुःख कोण कुरवाळतो?कधी त्यांच्या दु:खावरती कुठली फिल्मी सेलेब्रेटी बोललेली पहिले आहे?हाताच्या बोटावर मोजता येतील असे काही लोकं त्यांच्या पाठीशी असतात.कोण हा किंग खान ?ह्या हिंदुस्थानात त्याचे काय योगदान आहे ? टिपू सुलतान ज्याने हजारो  गावे लुटली,देवळे उद्ध्वस्त केली,अनेक हिंदूंना बाटवले त्यावर हा सिनेमा बनवतो हेच काय ते योगदान. का आपण त्याच्यावर आणि त्याच्या औलादीवर वेळ वाया घालवतो?आर्यन खानाने अपराध केला आहे आणि त्याची शिक्षा तो भोगेल. राणी लक्ष्मी बाई आपल्या पाठीवर छोट्या दामोदरला घेऊन ब्रिटिशां विरोधात लढल्या.प्राण अर्पण केले .पण आपल्याला कधीतरी त्या छोट्या दामोदरचे पुढे काय झाले असेल हा प्रश्न पडला का?२ वर्षाचे  मूल  हे  खरेच छोटे असते.त्यात पुन्हा वडील नाहीत.आई ने बलाढ्य ब्रिटिशांसोबत पंगा घेतलेला.आणि त्यातच तिचा अंत झाला.पुन्हा हे युद्ध का झाले ?तर ब्रिटिशांनी जे "docterine  of  lapse " भारतीय  संस्थानिकांवर  लादले त्या अनुसार जर राजगादीला वारस नसला तर ते राज्य ब्रिटिश साम्राज्याचा भाग बनत असे.राणीने ह्याला विरोध दर्शवत आपल्या पोटच्या मुलाच्या मृत्यूनंतर पती निधनाच्या एक दिवस आधी दामोदर राव यांना दत्तक घेतले.परंतु ब्रिटिशाना ते अमान्य होते.आणि म्हणूनच राणी आणि ब्रिटिशांच्यात हे युद्ध झाले.भल्या भल्या राजांनी ब्रिटिशांसमोर हात टेकले आणि त्यांना शरण गेले.पण राणी प्राणपणाने लढली.मग अश्या ह्या पार्श्वभूमीवर राणीच्या निधनानं नंतर छोट्या दामोदरचे काय झाले असेल.बघा कल्पना करून ? सुरुवातीला काही दिवस दामोदर पंत राणीचे जे  कोणी  विश्वासू सैन्य होते त्यांच्या सोबत वेगवेगळ्या जंगलात राहिले .त्या नंतर कोणी तरी आसरा देईल ह्या आशेने अनेक राज्ये फिरले.पण कोणालाही ब्रिटिशांशी वैर नको होते.अशीच दोन वर्षे गेली.राणीचा एक अत्यंत विश्वासू "नन्हें खान "नामक गृहस्थ होते.त्यांनी मध्यस्थी करून एका ओळखीचे पण खात्री शीर ब्रिटिश ऑफिसरांकडे बोलणी करून छोट्या दामोदरविषयी सांगितले आणि ब्रिटिश  आणि दामोदर राव ह्यांच्यात समेट घडवून आणला.४ वर्षांचे कोवळे वय.आई बापावीण मूल. त्यांना ब्रिटिशांनी इंदूर येथे आणले आणि तेथे स्थायिक  केले.त्यांना २०० रुपय प्रति महिना पेन्शन सुरु केली.परंतु राजघराण्यातील कोणतेही हक्क किंवा संपत्ती त्यांना दिली गेली नाही.ह्या सगळ्यावर ब्रिटिशांनी कब्जा केला.दामोदर राव जिवंत असे तोवर हि पेन्शन चालू होती.दामोदर राव हे पेशाने फोटोग्राफर होते परंतु त्यात त्यांना जास्त यश नाही मिळाले. दामोदर राव ह्याच्या मृत्यूनंतर पेन्शन अर्ध्यावर आणली आणि कालांतराने बंदही केली . त्यांचा मुलगा लक्ष्मण  राव आणि नातू कृष्णा राव हे इंदूर च्या कोर्टा समोर बसून टायपिंग चे काम करायचे.त्यातून जे काही अत्यल्प  अर्थार्जन यायचे त्यातच गुजराण करायचे. त्यानंतर  अरुण कृष्ण राव ह्यांचा मुलगा योगेश अरुण राव हे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नागपूर येथे कार्यरत आहेत. लक्ष्मी  बाईंच्या मृत्यूनंतर त्यांचे हे कुटुंब जवळपास अज्ञातवासात राहत होते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. वेळोवेळी दामोदर राव ह्यांनी ब्रिटिशांकडे आपल्या हक्काविषयी मांडणी केली.परंतु प्रत्येक वेळी ती नाकारली गेली.आणि ह्या उलट पतौडी खान ह्यांच्या संस्थानाचे  भारतात विलीनीकरण होऊनसुद्धा त्यांच्या मुलाला आजही नवाब म्हटले जाते.सैफ अली खान आणि करीन कपूरची मुलं काय खातात,कशी हसतात ,काय ओकतात ह्यावर सुद्धा बातम्या. 

ज्यावेळी राणी धारातीर्थी पडली तेव्हा तिच्या डोक्याचा एक भाग आणि डोळा शरीरपासून तुटला होता .छोट्या दामोदरला विश्वासू सैनिकांकडे  सुपूर्द केल्यानंतर मृत्यूनंतरही आपले शरीर ब्रिटिशांच्या हातात पडू नये अशी इच्छा व्यक्त केली आणि प्राण सोडले.तिच्यावर तातडीने अंत्य संस्कारही करण्यात आले.इतके पराकोटीचे हौताम्य पत्करलेल्या राणीला आणि तिच्या वंशाला  आपण सहज विसरतो . राणीवरती काही लोकांनी गरळ ओकली हे माझ्या कानावर पडले होते.तिची सर कुणालाही येणे शक्यच नाही.परंतु तिच्या शौर्यावर ,निष्ठेवर किंवा एकंदर तिच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवर काही लोक साशंक आहेत.त्यांना माझे एकच सांगणे असेल.लढाई वगैरे राहू देत बाजूला .नुसतीच नऊवारी नेसून,पाठीवर  बाहुली  बांधून एका हातात ढाल आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन ,घोड्यावर बसून नुसतीच रपेट मारावी  आणि मगच बोलावे.राणीने किंवा त्यांच्या वारसांनी कधीही कुणासमोर भीक मागितली नाही.त्यांचे वंशज अत्यंत गरिबीत जगले पण कुणासमोर मिंधे झाले नाहीत.आजची परिस्थिती जर राणी बघत असेल तर तिचा आत्मा तळतळल्या वाचून राहणार नाही. आता आपणच ठरवा.कुणाच्या वारसाला महत्त्व  द्यायचे ते.