पाटणा बॉम्बस्फोट प्रकरणी ९ दोषी; १ रोजी सुनावणार शिक्षा

पाटण्यातील गांधी मैदानात ८ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीत एकामागून एक अनेक बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी एनआयएच्या विशेष कोर्टाने बुधवारी मोठा निर्णय दिला आहे.

Story: पाटणा : |
28th October 2021, 12:40 am
पाटणा बॉम्बस्फोट प्रकरणी ९ दोषी; १ रोजी सुनावणार शिक्षा


पाटणा : पाटण्यातील गांधी मैदानात ८ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीत एकामागून एक अनेक बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी एनआयएच्या विशेष कोर्टाने बुधवारी मोठा निर्णय दिला आहे. बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए कोर्टाने १० आरोपींपैकी फखरुद्दीन नावाच्या एका आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. त्याचबरोबर इतर सर्व ९ आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. सर्व आरोपींना येत्या १ नोव्हेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणी आतापर्यंत १८७ जणांची कोर्टात सुनावणी झाली आहे.
पाटण्यातील गांधी मैदानातील बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी २७ ऑक्टोबर २०१३ ला पाटणा येथील गांधी मैदान पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. यानंतर ३१ ऑक्टोबर २०१३ ला एनआयएने या प्रकरणाची सूत्रे हाती घेतली आणि १ नोव्हेंबरला दिल्ली एनआयए पोलीस ठाण्यात पुन्हा एफआयआर नोंदवण्यात आला. यामध्ये एका अल्पवयीन मुलासह १२ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अल्पवयीन आरोपीला यापूर्वीच जुवेनाइल बोर्डाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.