Goan Varta News Ad

करमल घाटात सहा तास वाहतूक ठप्प

|
22nd June 2021, 11:48 Hrs
करमल घाटात सहा तास वाहतूक ठप्प

करमल घाटात बंद पडलेल्या ट्रकांमुळे ठप्प झालेली वाहतूक.     

काणकोण : कर्नाटकातून गोव्यात मडगावच्या दिशेने जाणारा एक मालवाहू ट्रक करमल घाटात पहाटे पाच दरम्यान बंद पडला. त्याच्या पाठोपाठ दुसरा एक मालवाहू ट्रक तेथेच बंद पडल्याने या रस्त्यावरून धावणाऱ्या इतर वाहनांना पुढे जाण्यास मिळाले नाही. अरुंद रस्ता व दोन्ही बाजूंनी वाहने थांबवून ठेवल्याने वाहतूक ठप्प झाली.
दरम्यान, क्रेनच्या साहाय्याने सदर बंद पडलेले दोन्ही ट्रक बाजूला करून सुमारे ६ तासांनी वाहतूक सुरळीत झाली. करमल घाटात वाहतूक कोंडी झाल्याने मडगावहून येणारी वाहने बाळ्ळी-बेतुलमार्गे तसेच कारवारहून आलेली वाहने आगोंद-बेतुलमार्गे मडगावला सोडण्यात आली होती.