Goan Varta News Ad

गीता, कुराण यांना कमी लेखणे हा मूलभूत अधिकार नाही : उच्च न्यायालय

|
11th June 2021, 12:42 Hrs

गीता, कुराण यांना कमी लेखणे हा मूलभूत अधिकार नाही : उच्च न्यायालय

बेंगळुरू : 

कोणत्याही एका धर्मावर विश्वास ठेवावा म्हणून इतर धर्मांना कमी लेखण्याचा अधिकार कुठल्याही धर्माला नाही. भगवद्गीता आणि कुराणाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे हा ख्रिश्चनपंथीयांचा मूलभूत  अधिकार नाही, असे मत  कर्नाटक उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. अन्य धर्मांची बदनामी केल्याबद्दल दोन ख्रिश्चन व्यक्तींविरोधातली दाखल केलेली फौजदारी तक्रार रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिला. 

एका महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारावर हा खटला सुरु होता. या महिलेची तक्रा होती की, आरोपी महिलेल्या घरी आले आणि त्यांनी तिला आपल्या धर्माबद्दल सांगण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी इतर धर्म आपल्या धर्माप्रमाणे महान नाहीत अशा पद्धतीने तिला पटवून देण्याची सुरुवात केली.


--------------

-चौकट-

इतरांच्या धर्मभावना दुखावणे हा घटनात्मक हक्क कसा?

दोन ख्रिश्चन व्यक्तींनी भगवद्गीता आणि कुराणाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची तक्रार एका महिलेने दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावण्याचा गुन्हा दाखल करून आरोपपत्र सादर केले. त्यावर, आपल्या मूलभूत हक्कांचा भंग होत असल्याने हा खटला रद्द करावा यासाठी आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, कोर्टाने दोन्ही बाजू समजून घेत आरोपींची मागणी फेटाळून लावली आहे.

----------------