Goan Varta News Ad

नव्या करोनाचे देशात ५८ बाधित

ब्रिटनमध्ये सापडलेल्या नवीन प्रकारच्या विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची भारतातील संख्या आता ५८ झाली आहे. तर गेल्या ३९ दिवसांमध्ये करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.

Story: दिल्ली : |
06th January 2021, 12:15 Hrs
नव्या करोनाचे देशात ५८ बाधित

दिल्ली : ब्रिटनमध्ये सापडलेल्या नवीन प्रकारच्या विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची भारतातील संख्या आता ५८ झाली आहे. तर गेल्या ३९ दिवसांमध्ये करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये २९,०९१ जण करोनामुक्त झाले आहेत. देशात गेल्या २४ तासांमध्ये ८,९६,२३६ जणांची चाचणी करण्यात आली. एका दिवसात रुग्णनोंदीत १२,९१७ जणांची घट झाल्याचे दिसून आले आहे. भारतात आता करोनाबाधितांचा रोजचा आकडाही कमी होताना दिसून येत आहे.