चीनने करोना दडपण्याचा प्रयत्न केला


11th July 2020, 07:59 pm

हॉंगकॉंग – करोना विषाणूने आता जगभरात 1 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लागण झाली आहे आणि सर्व जगात या विषाणूचे थैमान सुरू असताना एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. या विषाणूच्य घातक स्वरूपाबाबत चीनला पूर्ण माहिती होती आणि हे भीषण सत्य दडपण्याचा प्रयत्न चीनच्या वरिष्ठ सरकारी पातळीवरून करण्यत आला, असा गौप्यस्फोट हॉंगकॉंगवरून अमेरिकेत पळून गेलेल्या एका विषाणूतज्ज्ञ महिलेने केला आहे. यामुळे या विषाणूच्या प्रादुर्भावाला चीनच जबाबदार आहे, या जगभरातील दाव्याला मोठे पाठबळच मिळाले आहे.

ली मेंग यांन असे या विषाणूतज्ज्ञ महिलेचे नाव आहे. हॉंगकॉंग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधून त्यांना व्हायरोलॉजी आणि इम्युनोलॉजीचे विशेष शिक्षण घेतले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा या विषाणूचा प्रादुर्भाव दिसायला लागला तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेच्या इंफ्लूएंझाच्या विशेष प्रयोगशाळेच्या माध्यमातून जगाला माहिती देणे हे चीनला शक्‍य होते. मात्र, या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या आपल्या निरीक्षकांनी आपल्या संशोधनाकडे दुर्लक्ष केले. जर हे दुर्लक्ष केले गेले नसते तर अनेकांचा जीव वाचवणे शक्‍य झाले असते, असेही यांन यांनी म्हटले आहे

हेही वाचा