डिचोली अपघातातील जखमी युवकाचा गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू

जिममधून परतत असताना झाला होता अपघात; जिममधील व्यायाम आटोपून घरी परतत असताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या २२ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तन्मय खरवत (२२, रा. कुडचिरे, डिचोली) असे मृत युवकाचे नाव आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
डिचोली अपघातातील जखमी युवकाचा गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू

डिचोली : जिममधील व्यायाम आटोपून घरी परतत असताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या २२ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तन्मय खरवत (२२, रा. कुडचिरे, डिचोली) असे मृत युवकाचे नाव आहे. शनिवारी सकाळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) (Goa Medical college (GMC)) रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, तन्मय हा बोर्डे येथील जिममधून व्यायाम करून घरी परतत होता. यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले होते.

गोमेकॉत डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर अपयशी ठरली. शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे कुडचिरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा
सर्व पहा