सांगे नगरपालिकेत टाकली मृत कुत्र्यांच्या अवशेषाची पिशवी

मेशू डिकॉस्ता याच्याविरुद्ध सांगे पोलीस स्थानकात गुन्हा नोंद; : सांगे नगरपालिका (Sanguem Muncipality) इमारतीत मृत कुत्र्यांच्या अवशेषाची पिशवी टाकून दहशत माजवल्याप्रकरणी सांगे पोलिसांनी मेसियास ऊर्फ मेशू डिकॉस्ता याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
11 hours ago
सांगे नगरपालिकेत टाकली मृत कुत्र्यांच्या अवशेषाची पिशवी

सांगे : सांगे नगरपालिका (Sanguem Muncipality)  इमारतीत मृत कुत्र्यांच्या अवशेषाची पिशवी टाकून दहशत माजवल्याप्रकरणी सांगे पोलिसांनी मेसियास ऊर्फ मेशू डिकॉस्ता याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सांगे नगरपालिकेचे मुख्याधिकारी विराज मलकर्णी यांनी तक्रार दाखल केल्यानंतर वरील गुन्हा नोंदवण्यात आला. तक्रारीनुसार ५ नोव्हेंबर रोजी दुपारी संशयित मेशू डिकॉस्ता याने नगरपालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागाच्या खिडकीजवळ मृत कुत्र्याच्या अवशेषांची पिशवी टाकली. त्यानंतर नगरपालिकेत एकच खळबळ माजली. 

त्याच्या या कृत्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण होऊन आरोग्याला मोठा धोका निर्माण झाल्याचे व उपद्रव निर्माण झाल्याचे नगरपालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले. यासंदर्भात सांगे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक कृष्णदीप बोरकर पुढील तपास करीत आहेत. संशयितावर कायदेशीर कर्तव्य बजावण्यापासून रोखणे आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, यापूर्वीही नगरपालिकेच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याचबरोबर अटक करून नंतर जामीनावर सुटका करण्यात आली होती. 

हेही वाचा
सर्व पहा