एकोशी-बिठ्ठोण येथे नरकासूर प्रतिमेचे काम करताना पडून युवक गंभीर जखमी

बसच्या कॅरियरमध्ये अडकला; एकोशी-बिठ्ठोण येथे नरकासूर प्रतिमेचे काम करताना पडून एक युवक गंभीर जखमी झाला. नरकासूर प्रतिमेवर प्रकाशझोत टाकण्यासाठी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या लोखंडी कमानीवर काम सुरू असताना ही घटना घडली.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
एकोशी-बिठ्ठोण येथे नरकासूर प्रतिमेचे काम करताना पडून युवक गंभीर जखमी

पणजी : एकोशी-बिठ्ठोण येथे नरकासूर प्रतिमेचे काम करताना पडून एक युवक गंभीर जखमी झाला. नरकासूर प्रतिमेवर प्रकाशझोत टाकण्यासाठी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या लोखंडी कमानीवर काम सुरू असताना ही घटना घडली.

शनिवारी श्रीकृष्ण मंदिराजवळ सकाळी ही घटना घडली. लोखंडी कमानीवर युवक काम करत होता. त्यावेळी खालून जात असलेल्या एक बसच्या कॅरियरमध्ये युवक अडकला आणि धडक बसल्याने गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला विजेचा झटका बसल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली माहिती घेतली व पंचनामा केला. जखमी युवकाला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

वरील अपघातामुळे नरकासूर प्रतिमा तयार करताना व हाताळताना रस्त्यावर उभारण्यात आलेल्या लोखंडी कमानी आणि विद्युत व्यवस्थेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

हेही वाचा
सर्व पहा