पणजी : निलंबित पोलीस चालक गौरेश नाईक याच्या निवासस्थानी दक्षता विभागाने छापा टाकून झडती घेतली. वाळपई येथील नाणूसमधील बेतकेकरवाडा येथील बंगल्यावर ही कारवाई करण्यात आली. (Vigilance Department conducted a search at the residence of suspended police driver Garesh Naik at Betkekarwada, Nanus, Valpoi).
हळदोणा मतदारसंघाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी विधानसभा अधिवेशनात राज्यातील पोलीस खात्यातील पोलिसांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. काही पोलिसांची मालमत्ता, भ्रष्टाचार, गुन्हेगारी यांचे किस्से यांची माहिती दिली होती. आणि कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अशा पोलिसांची नावे दिल्यास कारवाई करण्याचे आश्वासन विधानसभेत दिले होते.
त्यानुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता दक्षता विभागाने ही झडती घेतल्याने या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, या झडतीत नेमके काय आढळले आणि पुढील कारवाई काय होणार, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.


