मडगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशावर धारदार शस्त्राने हल्ला, संशयित अटकेत

मडगाव रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ वरील तिकीट खिडकीजवळ एका प्रवाशावर धारदार वस्तूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी संशयित राजू कांबळे याच्याविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
मडगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशावर धारदार शस्त्राने हल्ला, संशयित अटकेत

मडगाव : मडगाव रेल्वे स्थानकाच्या (Konkan Railway station, Madgaon) फलाट क्रमांक ६ वरील तिकीट खिडकीजवळ एका प्रवाशावर धारदार वस्तूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी संशयित राजू कांबळे याच्याविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.

ही घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.या हल्ल्यात कैलास रामदास गुंड (वय ३९, रा. ईश्वरवाडी, पियतान, औरंगाबाद, महाराष्ट्र) हे जखमी झाले आहेत. ते व्यवसायाने वेल्डर आहेत. अचानक झालेल्या वादातून संशयिताने त्यांच्यावर धारदार वस्तूने हल्ला केला. यात त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होऊन रक्तस्राव झाला. 

याप्रकरणी कैलास गुंड यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कोकण रेल्वे पोलीस स्थानकात गुरुवारी रात्री भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास कोकण रेल्वे पोलीस उपनिरीक्षक विप्लव वस्त करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा