कारापूर गावात फूट पाडण्याचा प्रयत्न : युरी आलेमाव

लोढा प्रकल्पामुळे कारापूर-सर्वण गावातील लोकांमध्ये फूट पडते आणि गावातील शांती आणि एकजूट मोडण्याचा प्रयत्न होतो. गावातील युवक आतापर्यंत एकमेकाजवळ भावकीने राहत असताना त्यांना एकमेकाविरुद्ध उभे करण्याचे प्रयत्न लोढाकडून होत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
कारापूर गावात फूट पाडण्याचा प्रयत्न : युरी आलेमाव

पणजीः लोढा प्रकल्पामुळे कारापूर-सर्वण गावातील लोकांमध्ये फूट पडते आणि गावातील शांती आणि एकजूट मोडण्याचा प्रयत्न होतो. गावातील युवक आतापर्यंत एकमेकाजवळ भावकीने राहत असताना त्यांना एकमेकाविरुद्ध उभे करण्याचे प्रयत्न लोढाकडून होत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव  (Yuri Alemao) यांनी केला.

कारापूर सर्वण येथे व्हॉलीबॉल खेळण्यासाठी एकत्र आलेले आंदोलक गौरीश घाडी यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने त्यांची गोवा वैद्यकीय महाविद्यालयात भेट घेतली. त्यावेळी युरी आलेमावसह गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, उपाध्यक्ष सुनिल कवठणकर आणि इतर नेते उपस्थित होते.
कारापूर सर्वण येथील लोकांना का लक्ष्य केले जाते. या हल्ल्याची लवकर चौकशी करून या प्रकरणात सहभागी असलेल्यांना अटक करावी, अशी मागणी आलेमाव यांनी केली. यापूर्वीही धमक्या दिल्याच्या तक्रारी आल्या आहेत. मात्र, पोल‌िसांनी त्यावर प्रभावी कारवाई केली नाही, अशी खंत आलेमाव यांनी व्यक्त केली.
गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था कोसळली आहे. पूर्वी तक्रारी करूनही पोलिसांनी कारवाई केलेली नाही. त्यामुळे लोक स्वत: कायदा हातात घ्यायला प्रवृत्त होतात. ‘राखणदार’ असायला हवे असलेले पोलीस अाज भक्षक बनले आहेत, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.
हल्लाप्रकरणी एकाला अटक
कारापूर डिचोली येथे झालेल्या दोन गटातील मारामारीच्या पार्श्वभूमीवर गौरीश घाडी यांच्यावरील हल्लाप्रकरणी डिचोली पोलिसांनी सर्वेश धावसकर याला अटक केली आहे. 

हेही वाचा
सर्व पहा