आयटीए पुरस्कार नामांकन; गोव्याच्या सोनम, अभिजित, अजय यांची चमक

‘ग्लोरी’च्या कलादिग्दर्शनाला जागतिक व्यासपीठावर दाद!; गोव्यातील कलाकारांनी मनोरंजनविश्वात पुन्हा एकदा आपल्या प्रतिभेची छाप उमटवली आहे. २६ व्या इंडियन टेलिव्हिजन अकादमी (आयटीए) (The 26th ITA Awards) पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक : ओटीटी’ या प्रतिष्ठेच्या श्रेणीतील नामांकनांमध्ये गोव्याच्या तीन कलाकारांनी स्थान मिळवले आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
आयटीए पुरस्कार नामांकन; गोव्याच्या सोनम, अभिजित, अजय यांची चमक

पणजी : गोव्यातील कलाकारांनी मनोरंजनविश्वात पुन्हा एकदा आपल्या प्रतिभेची छाप उमटवली आहे. २६ व्या इंडियन टेलिव्हिजन अकादमी (आयटीए) (The 26th ITA Awards) पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक : ओटीटी’ या प्रतिष्ठेच्या श्रेणीतील नामांकनांमध्ये गोव्याच्या तीन कलाकारांनी स्थान मिळवले आहे. त्यामुळे गोव्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय ‘ग्लोरी’ या वेब सीरिजसाठी गोव्यातील सोनम सिंग आणि अभिजीत गावकर यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक श्रेणीत नामांकन जाहीर झाले आहे. त्याचबरोबर नेटफ्लिक्सवरील ‘माँ बहन’ या वेब सीरिजसाठी अजय चोडणकर यांनाही याच श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

ओटीटी मनोरंजन विश्वातील प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसाठी झालेली ही निवड गोव्यातील कलाकारांच्या सर्जनशीलतेची आणि तांत्रिक कौशल्याची पावती मानली जात आहे. चित्रपट आणि वेब सीरिजच्या पडद्यामागे राहून कथेला दृश्यरूप देणाऱ्या कला दिग्दर्शकांच्या कामाची दखल या नामांकनांच्या माध्यमातून घेतली गेली आहे.

गोव्यातील तीन कलाकारांना एकाच पुरस्कार सोहळ्यात नामांकन मिळाल्याने स्थानिक कलाक्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, अंतिम पुरस्कारावरही त्यांची मोहोर उमटणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा
सर्व पहा