ऑलिव्ह रिडलेच्या संरक्षणासाठी आता जीसीसीआयचा पुढाकार; उद्योगांकडून मिळवणार सीएसआर निधी

राज्यात आढळणाऱ्या ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांचे (olive ridley sea turtle) संरक्षण करण्यासाठी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे (जीसीसीआय) (Goa Chamber of Commerce & Industry (GCCI)) पूर्णपणे सहकार्य केले जाणार आहे. चेंबर तर्फे ऑलिव्ह रिडलेच्या संरक्षणासाठी उद्योगांकडून सीएसआर, सीईआर निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चेंबरच्या अध्यक्षा प्रतिमा धोंड यांनी सांगितले.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
10 hours ago
ऑलिव्ह रिडलेच्या संरक्षणासाठी आता जीसीसीआयचा पुढाकार; उद्योगांकडून मिळवणार सीएसआर निधी

पणजी :  राज्यात आढळणाऱ्या ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांचे (olive ridley sea turtle)  संरक्षण करण्यासाठी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे (जीसीसीआय) (Goa Chamber of Commerce & Industry (GCCI)) पूर्णपणे सहकार्य केले जाणार आहे. चेंबर तर्फे ऑलिव्ह रिडलेच्या संरक्षणासाठी उद्योगांकडून सीएसआर, सीईआर निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चेंबरच्या अध्यक्षा प्रतिमा धोंड यांनी सांगितले.

नुकतेच वन खात्यातर्फे आयोजित उच्चस्तरीय बैठकीत ही घोषणा करण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य प्रधान वनसंरक्षक आणि कासव संरक्षण राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष  के. रमेश कुमार व अन्य अधिकारी उपस्थित होते. कासव संरक्षणासाठी सीएसआर निधी मिळावा यासाठी चेंबर उद्योग, व्यापार आणि वाणिज्य खात्यासोबत काम करणार आहे. स्वच्छ किनारा, सुरक्षित कासव हे ब्रँड गोवाचे एक प्रतीक असा चेंबरचा विश्वास आहे. उद्योग क्षेत्राला यामध्ये एक भागीदार बनवण्यात येईल. जीसीसीआय उद्योग क्षेत्राला एकत्रित करण्यासाठी उत्प्रेरक (कॅटॅलिस्ट) म्हणून काम करणार असल्याचे धोंड यांनी सांगितले.

१६ जून रोजी जागतिक समुद्री कासव दिन साजरा करण्याचा प्रस्ताव

तत्पूर्वी समितीने मत्स्योद्योग खात्याने समुद्री कासव संवर्धनासाठी केलेल्या जागृतीच्या कामाचा गौरव केला. खात्याने पारंपारिक मासेमार, ट्रॉलर मालक आणि संरक्षण संस्था यांच्यातील दुवा म्हणून काम केले आहे. खात्याने ट्रॉलर चालकांमध्ये ट्रॉल जाळ्यांमध्ये 'टर्टल एक्सक्लुडर डिव्हाइस'चा वापर अनिवार्य करण्याबाबत जनजागृती केली. जखमी किंवा जाळ्यात अडकलेल्या कासवांची तातडीने माहिती देणे, वन खाते आणि किनारी पोलिसांसोबत संयुक्त गस्तीदरम्यान पाठबळ पुरवण्याचे काम केले.

मत्स्यव्यवसाय विभाग आणि मासेमारी समुदायाच्या सक्रिय सहकार्याशिवाय कोणतीही नियमावली यशस्वी होऊ शकत नाही, असे मत समितीने नोंदवले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या समितीची स्थापना झाली होती. बैठकीत १६ जून रोजी जागतिक समुद्री कासव दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यात समुद्रकिनारा स्वच्छता, वाळू शिल्प (सँड आर्ट) आणि विद्यार्थी स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा