नावेलीत अमलीपदार्थविरोधी कारवाई, संशयित युवकाला अटक

नावेली येथील कोलदे परिसरात मडगाव पोलिसांनी अमलीपदार्थविरोधी कारवाई केली. यात कुडचडे येथील संशयित युनूस अहमद उर्फ माताजी (वय २८) याला अटक केली.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
नावेलीत अमलीपदार्थविरोधी कारवाई, संशयित युवकाला अटक

मडगाव : नावेली येथील कोलदे परिसरात मडगाव पोलिसांनी (Margao Police station) अमलीपदार्थविरोधी कारवाई केली. यात कुडचडे येथील संशयित युनूस अहमद उर्फ माताजी (वय २८) याला अटक केली. त्याच्याकडून ८९ हजार ९५० रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा व चरस, तसेच ८० हजार ७०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेसात ते रात्री दहा वाजण्याच्या वेळेत राष्ट्रीय महामार्ग ६६च्या सर्व्हिस रोडवरील अंडरपासजवळ ही कारवाई करण्यात आली. संशयास्पदरीत्या वावरणार्‍या संशयित युनूस अहमद याला पोलिसांनी ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे अमलीपदार्थ आढळून आले.

पोलिसांनी संशयिताकडून २३.७० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा, ज्याची किंमत ८२ हजार ९५० रुपये, तसेच ७ ग्रॅम चरस, ज्याची किंमत ७ हजार रुपये, असा एकूण ८९ हजार ९५० रुपये किमतीचा अमलीपदार्थांचा साठा जप्त केला. याशिवाय ८० हजार ७०० रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली.

 याप्रकरणी मडगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटक केलेल्या संशयिताकडे अमलीपदार्थांचा साठा कुठून आला आणि तो कोणाला विक्री करणार होता, याचा पुढील तपास मडगाव पोलीस करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा