पणजी : गोव्याचा युवा बुद्धिबळपटू एथन वाझ यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देदीप्यमान कामगिरी करत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे. व्हेनेझुएलाची राजधानी काराकास येथे झालेल्या ‘फिडे वर्ल्ड ज्युनियर अंडर-२० बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०२६’मध्ये एथनने जगज्जेतेपद पटकावले.
१८ ते २७ नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या जागतिक स्पर्धेत एथनने आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विश्वविजेता होण्याचा मान मिळवला. त्याच्या या ऐतिहासिक यशामुळे गोव्याच्या क्रीडा क्षेत्राची मान उंचावली आहे. राज्याच्या बुद्धिबळ क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


