पणजी : गोवा शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (GTET) १ डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. १५ डिसेंबर पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत आहे. बायोमेट्रिक नोंदणी (Biometric capture) आणि प्रशिक्षण: ४ ते ६ जानेवारी २०२७ पर्यंत दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत. ९ आणि १० जानेवारी २०२७ असे दोन दिवस परीक्षा होणार आहे.
परीक्षेसाठी म्हापसा, फोंडा आणि मडगाव ही तीन केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षेपूर्वी प्रवेशपत्राच्या सूचना जारी केल्या जाणार आहेत. उमेदवारांनी नव्या माहितीसाठी नियमितपणे अधिकृत वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी https://www.gbshse.in या वेबसाईटला भेट द्यावी.


