मोंते गिरी भुयारी मार्ग ठरला वाहतूक कोंडीचे नवे केंद्र

वाहतुकीचा हा नवीन मार्ग आणि वाहनांची प्रचंड संख्या यामुळे मोंते गिरी भुयारी मार्ग जंक्शनवर रोज वाहतूक कोंडी होत आहे. पर्वरी कॉरिडोअर उड्डाणपूल हा महामार्गावरील वाहतूक सुधारण्यासाठी महत्त्वाचा मानला जात होता. परंतु, सध्या हाच मार्ग गिरी, पर्वरी, म्हापसा आणि पेडणे येथील नोकरदार व प्रवाशांसाठी त्रासाचे कारण ठरला आहे.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th October, 11:46 pm
मोंते गिरी भुयारी मार्ग ठरला वाहतूक कोंडीचे नवे केंद्र

म्हापसा : पर्वरी ते गिरी दरम्यानची राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सर्व्हिस रोडवर वळवल्यामुळे मोंते गिरी भुयारी मार्ग जंक्शन हे ट्रॅफिक कोंडीचे नवीन ठिकाण बनले आहे. या निर्णयाचा मोठा फटका गिरीतील सेंट अँथनीवाडा, आराडी आणि मोंते गिरी या परिसरातील रहिवाशांना बसत आहे.
जुना बाजार पर्वरी-सांगोल्डा जंक्शनजवळ पर्वरी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती. यापूर्वी सुकूर मलनिस्सारण प्रकल्पाजवळ सर्व्हिस रोडवरून वाहतूक जोडण्यात आली होती. मात्र, नुकतेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा मार्ग बंद करून पणजी ते म्हापसा दरम्यानची उड्डाणपुलाखालील वाहतूक सर्व्हिस रोडवर वळवली आहे.
मोंते गिरी जंक्शनवर वळवलेल्या या वाहतुकीवर शासनाने आणि प्रशासनाने तत्काळ योग्य तोडगा काढून गावाला ट्रॅफिक कोंडीतून मुक्त करावे, अशी मागणी सेंट अँथनीवाडा येथील रहिवासी करत आहेत.

सकाळ-संध्याकाळी तासन् तास कोंडी
वाहतुकीचा हा नवीन मार्ग आणि वाहनांची प्रचंड संख्या यामुळे मोंते गिरी भुयारी मार्ग जंक्शनवर रोज वाहतूक कोंडी होत आहे. महामार्गाच्या पलीकडे असलेल्या सेंट अँथनीवाड्यातील रहिवाशांसह मोंतेगिरी आणि आराडीतील लोकांना सकाळ आणि संध्याकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी तासन् तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे. पर्वरी कॉरिडोअर उड्डाणपूल हा महामार्गावरील वाहतूक सुधारण्यासाठी महत्त्वाचा मानला जात होता. परंतु, सध्या हाच मार्ग गिरी, पर्वरी, म्हापसा आणि पेडणे येथील नोकरदार व प्रवाशांसाठी त्रासाचे कारण ठरला आहे.

हेही वाचा
सर्व पहा