नरकासुर पाहायला गेलेली बेपत्ता तरुणी पणजी बसस्थानकावर सापडली!

अपहरण नव्हे तर स्वेच्छेने मित्रासोबत गेल्याची तरुणीची हणजूण पोलिसांना माहिती; दिवाळीच्या पुर्वसंध्येला नरकासुराच्या प्रतिमे पाहण्यासाठी मैत्रिणीसोबत घराबाहेर पडलेली १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याने हणजूण पोलीस स्थानक (Anjuna Police station) हद्दीत खळबळ उडाली होती. मुलीचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करत वडिलांनी हणजूण पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, ती युवती पणजी बसस्थानकावर सुखरूप आढळली.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
1 hours ago
नरकासुर पाहायला गेलेली बेपत्ता तरुणी पणजी बसस्थानकावर सापडली!

म्हापसा : दिवाळीच्या पुर्वसंध्येला नरकासुराच्या प्रतिमे पाहण्यासाठी मैत्रिणीसोबत घराबाहेर पडलेली १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याने हणजूण पोलीस स्थानक (Anjuna Police station)  हद्दीत खळबळ उडाली होती. मुलीचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करत वडिलांनी हणजूण पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, ती युवती पणजी बसस्थानकावर सुखरूप आढळली. अपहरण नव्हे तर स्वेच्छेने आपण मित्रासोबत गेल्याचे तरुणीने हणजूण पोलिसांना सांगितले आहे. त्यानंतर पोलिसांनी तिच्या मित्राचा शोध घेणे सुरू केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास  १९ वर्षीय तरुणी साळगाव येथे नरकासुराच्या प्रतिमा पाहण्यासाठी मैत्रिणीसोबत गेली होती. मात्र, त्यानंतर ती घरी परतली नाही. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या तिच्या वडिलांनी ९ नोव्हेंबर रोजी रात्री उशीरा हणजूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अज्ञात व्यक्तीने बळाचा किंवा फसवणुकीचा वापर करून मुलीचे अपहरण केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता.

या तक्रारीवरून हणजूण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३८ अंतर्गत गुन्हा नोंद करून शोध सुरू केला.  १० नोव्हेंबर रोजी रात्री बेपत्ता तरुणी पणजी बसस्थानकावर आढळून आली. पोलिसांनी तिला हणजूण पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता, आपले कोणाकडूनही अपहरण झाले नसून आपण स्वतःच्या इच्छेने पुरुष मित्रासोबत गेल्याचे तिने सांगितले. संबंधित मित्राचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक प्रयत्नशील आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साईश किनळेकर करीत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा