कला अकादमीच्या आवारात कामगाराची डोके ठेचून निर्घृण हत्या

पणजीतील कला अकादमीच्या आवारात सुरू असलेल्या शॉपिंग सेलच्या ठिकाणी एका कामगाराची लोखंडी पट्टीने डोके ठेचून हत्या करण्यात आली आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
3 hours ago
कला अकादमीच्या आवारात कामगाराची डोके ठेचून निर्घृण हत्या

पणजी: पणजी येथील कला अकादमीच्या परिसरात शुक्रवारी सकाळी एका कामगाराची डोके ठेचून निर्घृण हत्या झाल्याचे उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कला अकादमीच्याआवारात सध्या एक शॉपिंग सेल सुरू असून, तेथेच रात्रीच्या वेळी ही हिंसक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्ती तेथेच काम करणारा एक कामगार होता. त्याच्या डोक्यावर लोखंडी पट्टीने किंवा तत्सम जड वस्तूने जोरदार वार करून त्याचा खून करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पणजी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून, तपासाच्या दृष्टीने कला अकादमीचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. सर्वसामान्यांना तसेच बाहेरील व्यक्तींना सध्या या परिसरात प्रवेश करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळावरील रक्ताचे नमुने, ठसे आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

हत्त्येमागील नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तसेच शॉपिंग सेल मधील इतर कामगार आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.


बातमी अपडेट होत आहे. 


हेही वाचा
सर्व पहा