गोकर्णच्या तदडी बंदरात गुदमरून तिघांचा मृत्यू

उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा तालुक्यातील गोकर्णजवळ असलेल्या तदडी बंदरात मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास दुर्घटना घडली. मासेमारीच्या बोटीतून माशांचा कचरा बाहेर काढत असताना श्वास गुदमरल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाला.


41 mins ago
गोकर्णच्या तदडी बंदरात गुदमरून तिघांचा मृत्यू

गोवन वार्ता वार्ताहर
कारवार
उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा तालुक्यातील गोकर्णजवळ असलेल्या तदडी बंदरात मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास दुर्घटना घडली. मासेमारीच्या बोटीतून माशांचा कचरा बाहेर काढत असताना श्वास गुदमरल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाला. एका ज्येष्ठ कामगारावर गोकर्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत नवशाद अलीशा राजा (३५, कागाल हिणी), अमन अय्युब लंगडो (१८, वन्नळ्ळी, कुमटा) आणि अमीर अब्दुल (२०, कागाल हिणी) यांचा मृत्यू झाला. तर अब्दुल याकूब दाडिया (६०) यांना उपचारासाठी गोकर्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
तदडी बंदरात मासेमारीच्या बोटीतून माशांचा कचरा काढण्याचे काम सुरू होते. याचवेळी कामगारांचा श्वास गुदमरल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेत तिघांना जीव गमवावा लागला. मृतांमध्ये १८ वर्षांच्या तरुणाचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी दखल घेतली. पोलिस निरीक्षक श्रीधर एस. आर. आणि पोलीस उपनिरीक्षक अनिल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेमागील नेमके कारण आणि परिस्थितीबाबत पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे मृत कामगारांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बंदरातील कामादरम्यान घडलेल्या या दुर्घटनेने मासेमारी क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.      

हेही वाचा
सर्व पहा