बाणावली आणि वेळ्ळी मतदारसंघांबाबत काँग्रेस तडजोड करणार नाही : गिरीश चोडणकर

भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी काँग्रेस तयार आहे. बाणावली तसेच वेळ्ळी मतदारसंघांत पक्ष ‌जिंकणार. बाणावली आणि वेळ्ळी मतदारसंघांबाबत आता काँग्रेस तडजोड करणार नाही, असा विश्वास गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केला.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
27th October, 03:59 pm
बाणावली आणि वेळ्ळी मतदारसंघांबाबत काँग्रेस तडजोड करणार नाही : गिरीश चोडणकर

पणजी : भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी काँग्रेस तयार आहे.  बाणावली तसेच वेळ्ळी मतदारसंघांत पक्ष ‌जिंकणार. बाणावली आणि वेळ्ळी मतदारसंघांबाबत आता काँग्रेस तडजोड करणार नाही, असा विश्वास गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे (Goa Pradesh Congress Committee) अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी व्यक्त केला.

पणजी काँग्रेस हाऊसमध्ये मंगळवारी गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांचे पुतणे वॉरेन आलेमाव यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी चोडणकर आणि काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना चोडणकर यांनी सांगितले की, बाणावली आणि वेळ्ळीतील राजकीय घडामोडींचा विचार करून आणि लोकांच्या भावना आणि इच्छेला मान देऊन काँग्रेसने आतापर्यंत बराच वेळ दिला आहे. 

पण पक्षाच्या या संवेदनशीलतेला मजबुरी समजू नये. आमदारांवर सर्व बाजूने दबाव वाढायला लागल्याने काँग्रेसने आता ठाम भूमिका घेण्याचा  निर्णय घेतला आहे. लोकांचा विश्वास झाला आहे की, भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस हाच एकमेव पक्ष आहे. राष्ट्रीय पातळीवर आणि गोव्यात काँग्रेस भाजपबरोबर कसलीच तडजोड करत नाही, असे चोडणकार म्हणाले.

हेही वाचा
सर्व पहा