जीएफएच्या अध्यक्षपदासाठी आज चुरशीची लढत!

डॉ. कायतान फर्नांडिस आणि वालांका आलेमाव आमनेसामने; ३ वाजता पणजीत मतदान : गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) (Goa Football Association GFA) निवडणुकीकडे आज संपूर्ण फुटबॉल जगताचे लक्ष लागले आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 mins ago
जीएफएच्या अध्यक्षपदासाठी आज चुरशीची लढत!

पणजी : गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) (Goa Football Association GFA) निवडणुकीकडे आज संपूर्ण फुटबॉल जगताचे लक्ष लागले आहे. जीएफएच्याअध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष डॉ. कायतान फर्नांडिस (Dr. Caitano Jose Fernandes) आणि वालांका आलेमाव (Valanka Alemao)  यांच्यात थेट लढत होणार आहे. पणजी येथे आज दुपारी ३ वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसह उपाध्यक्ष, खजिनदार आणि कार्यकारी समितीच्या सदस्यांचीही निवड केली जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत फुटबॉलप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

गोव्यात फुटबॉलला मोठी परंपरा असून, राज्यातील फुटबॉलच्या विकासाच्या दृष्टीने जीएफएची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे संघाच्या नेतृत्वाची धुरा कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


विद्यमान अध्यक्ष डॉ. कायतान फर्नांडिस यांना पुन्हा संधी मिळणार की माजी मुख्यमंत्री चर्च‌िल आलेमाव यांची लाडली कन्या वालांका आलेमाव नव्या नेतृत्वासह बाजी मारणार, याचा फैसला आजच्या निवडणुकीत होणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा