कपडे धुण्याच्या स्पिनिंग मशीनमध्ये सापडून मुलगा जखमी

आसगाव येथील हॉस्टेलमधील प्रकार; आसगाव येथे एका हॉस्टेलच्या वॉशिंग (स्पिनिंग) मशीनमध्ये सापडल्याने १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. रोहन चव्हाण असे या मुलाचे नाव असून त्याची प्रकृत्ती चिंताजनक आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
25 mins ago
कपडे धुण्याच्या स्पिनिंग मशीनमध्ये सापडून मुलगा जखमी

म्हापसा : आसगाव येथे एका हॉस्टेलच्या वॉशिंग (स्पिनिंग) मशीनमध्ये सापडल्याने १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. रोहन चव्हाण असे या मुलाचे नाव असून त्याची प्रकृत्ती चिंताजनक आहे.  ही दुदैवी घटना आज सोमवारी २६ रोजी दुपारी सेकंड हाऊस आसगाव नामक हॉस्टेलमध्ये घडली. जखमी मुलगा हा हॉस्टेलच्या आवारात खेळत होता. त्यावेळी तो चुकून या कपडे धुण्याच्या स्पिनिंग मशीनजवळ गेला आणि आतमध्ये सापडला.

 हा प्रकार हॉस्टेलच्या कर्मचार्‍यांच्या निदर्शनास येताच त्यांनी मशीन बंद केले आणि रोहन चव्हाण याला बाहेर काढले. त्यानंतर लगेच त्याला म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचारार्थ  दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने तात्काळ जखमीला बांबोळी येथे गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवण्यात आले आहे. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास हणजूण पोलीस करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा