₹३ कोटी घेतल्याचे सिद्ध करा; आमदारकीचा राजीनामा देऊ : वीरेश बोरकर

आरजीपीमधील वाद पुन्हा उफाळला; अजय खोलकर यांनी मी तीन कोटी रुपये घेतल्याचा आरोप सिद्ध करावा. जर आरोप सिद्ध झाला तर आमदार म्हणून मी राजीनामा देणार, असे आव्हान आरजीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच आमदार वीरेश बोरकर यांनी खोलकर यांना दिले आहे.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
₹३ कोटी घेतल्याचे सिद्ध करा; आमदारकीचा राजीनामा देऊ : वीरेश बोरकर

पणजीः अजय खोलकर यांनी मी तीन कोटी रुपये घेतल्याचा आरोप सिद्ध करावा. जर आरोप सिद्ध झाला तर आमदार म्हणून मी राजीनामा देणार, असे आव्हान आरजीपीचे (Revolutionary Goans Party (RGP))  राष्ट्रीय अध्यक्ष तसेच आमदार वीरेश बोरकर (Viresh Borkar)  यांनी खोलकर यांना दिले आहे. तसेच खोलकर यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला चालवण्याचा इशारा बोरकर यांनी दिला आहे.

आरजीपीमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. हल्लीच गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने घेतलेल्या राजकीय नेत्यांच्या बैठकीत मनोज परब गटाचे सदस्य आरजीपीचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. त्यानंतर अजय खोलकर आणि मनोज परब यांनी बोरकर यांच्यावर सोशल मिडीयावर टीका सुरू करत त्यांनी पक्षाचा बेकायदेशीररितीने ताबा घेतल्याचा आरोप केला.

नंतर या सदस्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बोरकर यांनी दिल्यानंतर खोलकर यांनी सोशल मिडीयावर बोरकर यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाकडून तीन कोटींचे बॅग घेतल्याचा आरोप केला. तर मनोज परब यांनी सोशल मिडीयावर त्यांना शिव्या सुद्धा दिल्या. 

याविषयी बोरकर यांनी पदाधिकाऱ्यासहीत याविषयी मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे स्पष्टीकरण मागितले आणि आरजीपीच्या कार्यालयांचा नवा पत्ता, ईमेल अपडेट केला. यावेळी आरजीपीचे अध्यक्ष शविना शिरोडकर, मॅल्व‌िन वाझ उपस्थित होते.

भेट घेतल्यानंतर बोलताना सोशल मिडीया आणि प्रसार माध्यमातून आपली प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने ३ कोटींच्या कथित आरोपासहीत खोटी विधाने केल्याचा आरोप त्यांनी केला.

हे आरोप पूर्णपणे खोटे, अर्थहीन आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत. या प्रकरणांत मानहानीची तक्रार करून दोषी व्यक्तींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना कायदेशीर सल्लागाराला दिली असल्याची माहिती बोरकर यांनी दिली.

खोलकर हे आता आरजीपीचे सदस्य नाहीत आणि त्यांना पक्षातून यापूर्वीच काढून टाकले आहे. खोलकर यांनी पक्षाच्या निधीत भ्रष्टाचार वा निधीचा गैरवापर केला. आरजीपीचा एकच अधिकृत बँक खाते आहे आणि त्या खात्यात सध्या २३,६९९ रुपये एवढी रक्कम आहे. आरोप करणा व्यक्तींनी केवळ सोशल मिडीयावर विधाने न करता ठोस पुरावे सादर करावेत, असे आव्हान यांनी दिले.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या अधिकृत पत्रे कार्यालयीन तपशीलात केलेले बदल, ई-मेल अद्ययावत करणे आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया योग्य रितीने पू्र्ण केली आहे. अशा आरोपांनी मी किंवा माझे सदस्य गोमंतकीयांच्या हक्कांखातीर आणि पक्षाच्या बांधणीसाठी करणारे काम थांबवणार नाही, असे बोरकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा